Dhanush New Home Twitter
मनोरंजन बातम्या

Dhanush Gifts House For Parents: लेक असावा तर धनुषसारखा, आई-वडिलांना गिफ्ट दिला १५० कोटींचा बंगला

दाक्षिणात्य कलाकार धनुष सध्या त्याच्या 'वाथी या चित्रपटामुळे बराच चर्चेत आला आहे. तर दुसरीकडे धनुषने आपल्या परिवारासाठी एक गुड न्यूज दिली आहे.

Chetan Bodke

Dhanush New Home: दाक्षिणात्य कलाकार धनुष सध्या त्याच्या 'वाथी या चित्रपटामुळे बराच चर्चेत आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला आहे. अजूनही त्या चित्रपटाचा डंका बॉक्स ऑफिसवर कायम आहे. तर दुसरीकडे धनुषने आपल्या परिवारासाठी एक गुड न्यूज दिली आहे. नुकतेच त्याने चेन्नईतच अलिशान नवं घर घेतलेय.

सोमवारी त्याच्या नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. धनुषने हे नवं घर चेन्नईतील पोस गार्डनजवळ घेतले आहे. हे नवं घर त्याने त्याच्यासाठी न घेता आपल्या आई- वडिलांसाठी घेतले आहे. त्याच्या नव्या घराचे फोटो दिग्दर्शक सुब्रमण्यम शिवा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत त्याच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

दिग्दर्शक सुब्रमण्यम शिवा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. आपल्या पोस्टमध्ये दिग्दर्शक म्हणतात, "धनुषचे नवीन घर मला मंदिरासारखे वाटते... जी मुले आपल्या आई- वडीलांची उत्तम काळजी घेतात, त्यांना देवासारखे वाटते... ते सर्वांसाठीच नेहमी उत्तम उदाहरण बनतात." मिळालेल्या माहितीनुसार, धनुषचे घर आठ एकरांवर (अंदाजे 19,000 चौरस फूट) बांधलेले असून त्याचे चार मजली घर आहे. त्याच्या या अलिशान घराची किंमत जवळपास ₹ 150 कोटी एवढी आहे.

2021 मध्ये, धनुष आणि माजी पत्नी ऐश्वर्याने चेन्नईतील पोस गार्डन येथील घराचे भूमिपूजन केले होते. ऐश्वर्याचे आई-वडील, अभिनेता रजनीकांत आणि पत्नी लताने ही फेब्रुवारी 2021 मध्ये झालेल्या या समारंभात हजेरी लावली होती. गेल्या वर्षी धनुष आणि पत्नी ऐश्वर्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. धनुष आणि ऐश्वर्याने 2004 मध्ये लग्नगाठ बांधली असून त्यांना दोन मुलं देखील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! सुनील तटकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, राजकीय घडामोडींना वेग

CBI चे पथक नाशिकमध्ये दाखल, थेट दिल्लीतून घडामोडींना वेग; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल

Ladki Bahin Yojana: ६६ लाख लाडक्या बहिणींचे अर्ज बाद, सरकारचा १० हजार कोटींचा भार कमी, महत्वाची अपडेट वाचा

Surya Gochar: सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार, ४ राशींना लागणार मोठा जॉकपॉट; नोकरीत होईल प्रगती

SCROLL FOR NEXT