Tu Hi Re Maza Mitwa Marathi serial Saam tv
मनोरंजन बातम्या

Tu Hi Re Maza Mitwa: 'मनात काही असेल...'; ईश्वरी अर्णवच्या प्रेमळ नात्याची सुरुवात, नव्या प्रोमोनं वेधलं लक्ष

Tu Hi Re Maza Mitwa Marathi serial: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मराठी मालिका “तू ही रे माझा मितवा”च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे. लवकरच या मालिकेत नव्या प्रेमाची सुरुवात होणार आहे.

Shruti Vilas Kadam

Tu Hi Re Maza Mitwa Marathi serial: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मराठी मालिका “तू ही रे माझा मितवा”च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे. या प्रोमोमध्ये कथानकाला ट्विस्ट देणारा प्रसंग दाखवला असून, अर्णववर ईश्वरीच्या वडिलांच्या अपघातात सामील असल्याचा गंभीर आणि खोटा आरोप केला जातो. या धक्कादायक दाव्यामुळे मालिकेचे वातावरण अधिक ताणतणावपूर्ण बनते.

प्रोमोमध्ये अर्णव स्पष्टपणे सांगतो की तो पूर्णपणे निर्दोष आहे. त्याच्यावर झालेले आरोप फोल असल्याचे तो सांगत राहतो आणि सत्य बाहेर आणण्याचा निर्धारही व्यक्त करतो. त्याच्या मामांनी या परिस्थितीबद्दल त्याला सावध राहण्याचा सल्ला दिला असला तरी अर्णवच्या मनात फक्त एकच गोष्ट आहे. ईश्वरीचे मत आणि तिचा विश्वास. मीडिया आणि समाज काय बोलतात यापेक्षा त्याच्यासाठी ईश्वरीला दिलेली साथ आणि तिच्याबद्दलचे प्रेम अधिक महत्त्वाचे ठरते.

याचदरम्यान, दुसऱ्या प्रोमोमध्ये अर्णव आणि ईश्वरीच्या नात्याच्या भावनिक प्रवासाला अधिक गती मिळते. अर्णवने आपल्या भावनांविषयी अजून स्पष्ट शब्दांत काही सांगितले नसले तरी, त्याच्या वागण्यातून प्रेमाची चाहूल दिसते. त्यामुळे चाहत्यांमध्येही चर्चा सुरू आहे की, आगामी भागांमध्ये अर्णव अखेर ईश्वरीसमोर आपल्या प्रेमाची कबुली देईल का? एके ठिकाणी जेवायला गेले असता अर्नवला ठस्का लागल्यावर ईश्वरीने व्यक्त केलेली काळजी आणि मनात काही असेल तर सांग असे अर्नवचे मत यावरुन येणाऱ्या भागात या कपलमध्ये प्रेमाची सुरुवात होईल असा अंदाज प्रेक्षक लावत आहेत.

कथानकात आणखी एक गूढ प्रश्न उभा राहतो. अर्णववरील आरोपांमागील सत्य नेमके काय? आणि राकेशच्या (किंवा राजेशच्या) खोट्या ओळखीचे रहस्य कधी उलगडणार? हे दोन्ही धागे मालिकेला अधिक रोमांचक आणि उत्कंठावर्धक बनवत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप खासदाराच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग, नांदेडमध्ये नेमकं काय घडलं?

Leopard Terror: हिंगोलीत बिबट्यामुळे चक्काजाम; शेतकऱ्यांची कामे बंद, विद्यार्थ्यांना सुट्ट्या

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Tuesday Horoscope : खर्चाला गळतीच राहील; ५ राशींच्या लोकांना चोरीपासून सावध राहावे लागेल

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा नवा फॉम्युला, इच्छुकांची भाऊगर्दी, मतदारांच्या दारोदारी

SCROLL FOR NEXT