Marathi Serial Update SAAM TV
मनोरंजन बातम्या

Marathi Serial Update : लोकप्रिय मराठी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अडीच वर्षांचा प्रवास अखेर थांबणार

Star Pravah Serial Going Off Air : स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Shreya Maskar

'स्टार प्रवाह' वाहिनीवरील लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

मालिका गेले अडीच वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

'स्टार प्रवाह' वाहिनीवर दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

'स्टार प्रवाह' वाहिनीवर लवकरच दोन नवीन मालिका सुरू होत आहेत. चाहते नवीन मालिकांसाठी खूप उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण त्यांचे आवडते कलाकार मालिकेत असणार आहे. सप्टेंबर महिन्यात 'लपंडाव' (Lapandav) मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांची आवडती 'संजना' रूपाली भोसले पाहायला मिळणार आहे. तसेच नुकतीच 'नशीबवान' या नवीन मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत 'सुभेदार' चित्रपटात या अभिनेता अजय पूरकर खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

नवीन मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहेत. त्याचप्रमाणे काही जुन्या मालिका देखील प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लवकरच आकाश-भूमीची मालिका 'शुभविवाह' प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. कारण त्याची जागा 'लपंडाव' या नवीन मालिकेने घेतली आहे. 'शुभविवाह' (Shubhvivah) मालिकेने प्रेक्षकांचे तब्बल अडीच वर्ष मनोरंजन केले. ही मालिका 2023ला प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र आता 'शुभविवाह' लवकरच संपणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

'शुभविवाह' मालिका शेवटच्या काळात प्रेक्षकांना जास्त पसंतीस पडली नाही. मालिकेने घेतलेले नवीन वळण पाहून प्रेक्षक खूप नाराज झाले. ज्यामुळे मालिकेला जास्त प्रतिसाद मिळत नाही आहे. त्यामुळे 'शुभविवाह' लवकरच बंद होणार आहे. 'शुभविवाह' मालिकेच्या जागी आता नवीन मालिका 'लपंडाव' पाहायला मिळणार आहे.

'लपंडाव' मालिका

'लपंडाव' मालिका 15 सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार दुपारी 2:00 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'लपंडाव' मालिकेत अभिनेत्री कृतिका देव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर चेतन वडनेरे मालिकेचा हिरो आहे. मालिकेत रूपाली भोसलेला सर्वजण 'सरकार' अशी हाक मारताना दिसत आहे. मालिकेचा हिरो सरकारच्या घरी ड्रायव्हरची नोकरी करत आहे. 'लपंडाव' प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार असल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Social Media Platform: इन्स्टाग्राम की युट्यूब? कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होते अधिकची कमाई, वाचून व्हाल थक्क

India Alliance Protest: राहुल गांधी, संजय राऊतांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; इंडिया आघाडीचा मोर्चा रोखला| VIDEO

Navi Mumbai-Mumbra : दीड तासाचा प्रवास फक्त १५ मिनिटांत, मुंब्रा ते नवी मुंबईला प्रवास सुसाट होणार, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांना ताब्यात घेतलं

अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल, ५ नराधमांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; मुंबईत चाललंय काय?

SCROLL FOR NEXT