Marathi New Serial  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Marathi New Serial : "ती परत येतेय..."; नवीन हॉरर मालिकेची घोषणा, मुख्य भूमिकेत झळकणार 'बिग बॉस'चा विजेता

Star Pravah New Horror Serial : 'स्टार प्रवाह' वाहिनीवर नवीन हॉरर मालिका सुरू होत आहे. ज्याचा भयानक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. मालिकेचे नाव आणि मुख्य अभिनेता कोण, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'स्टार प्रवाह' वाहिनीवर नवीन हॉरर मालिका सुरू होत आहे.

मालिकेचा मुख्य अभिनेता 'बिग बॉस मराठी'चा विजेता आहे.

'स्टार प्रवाह' वाहिनीवर 'लपंडाव' आणि 'नशीबवान' या दोन नवीन मालिका सुरू झाल्या आहेत.

'स्टार प्रवाह'वर नवीन मालिकांची मेजवानी सुरूच आहे. आधी 'लपंडाव' त्यानंतर 'नशीबवान' आणि आता अजून एक हॉरर मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामुळे प्रेक्षक खूपच खुश असल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा 'स्टार प्रवाह' प्रेक्षकांना गूढ कथा दाखवण्यासाठी सज्ज झाले आहे. नुकताच मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. तो पाहून कोणालाही घाबरायला होईल.

प्रोमोमध्ये पाहून शकता की, मालिकेचा अभिनेता ऑफिसवरून घरी आपल्या बिल्डिंगमध्ये येत असतो. तो आपल्या फोनमध्ये व्यस्त असलेला पाहायला मिळतो. तेवढ्यात मागून पैंजणांचा आवाज येतो आणि तो थांबतो. तो जिन्यांवरून डोकावून पाहतो पण तिथे कोणी नसते. म्हणून आवाजाकडे दुर्लक्ष करून तो वरच्या मजल्यावर जाताना दिसतो. मात्र खाली अंधारात एका महिलेची सावली पाहायला मिळते. आता ही सावली नेमकी कोण, याचे रहस्य तर मालिकेत उलघडताना पाहायला मिळणार आहे.

नवीन मालिकेचे नाव काय?

नवीन मालिकेच्या प्रोमोला हॉरर कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "300 वर्षानंतर ती परत येतेय..." 'स्टार प्रवाह' वरील नवीन मालिकेचे नाव 'काजळमाया' (kajalmaya ) असे आहे. या मालिकेत मराठमोळा अभिनेता अक्षय केळकर ( Akshay Kelkar ) झळकणार आहे. अक्षय केळकर हा 'बिग बॉस 4' चा विजेता (Bigg Boss Marathi Season 4 Winner) राहिला आहे. मालिकेच्या प्रोमोवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. प्रेक्षक मालिका पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे.

'काजळमाया' मालिकेची रिलीज डेट आणि वेळ अद्याप जाहिर करण्यात आली नाही आहे. तसेच मालिकेत अजून कोणते कलाकार झळकणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच अक्षय केळकर या मालिकेतून नवीन भूमिकेत आणि अंदाजात पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT