सध्या जगभरात ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४’ची जोरदार चर्चा सुरू आहे. या फेस्टिव्हलमध्ये अनेक बॉलिवूडसह हॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींनी उपस्थिती लावली होती. यामध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीनेही उपस्थिती लावली होती. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री छाया कदम होती. यावेळी फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्रीच्या ‘ऑल वी इमेजिन ॲज लाईट’ या चित्रपटाचं स्क्रिनिंग पार पाडलं. यावेळी अभिनेत्रीला जगभरातल्या अनेक उपस्थित मान्यवरांनी स्टँडिंग ओव्हेशन दिले. सध्या हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
काही तासांपूर्वीच राजश्री मराठीच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यांच्या ‘ऑल वी इमेजिन ॲज लाईट’ या चित्रपटाचं कान्स फेस्टिव्हलमध्ये स्पेशल स्क्रिनिंग पार पडलं. या चित्रपटात त्यांची प्रमुख भूमिका आहे. चित्रपटातील सर्व कलाकार यावेळी स्क्रिनिंग दरम्यान उपस्थित होते. चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतर त्यांच्यासाठी सर्वच उभे राहून टाळ्या वाजवत होते, सध्या ह्या दरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, संपूर्ण ऑडीटोरियमने खास अभिनेत्रीसाठी उभ्या राहून टाळ्या वाजवल्या. मिळालेला प्रतिसाद पाहून अभिनेत्री भावूक झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते. त्यांच्या अभिनयाचे चाहत्यांकडून जोरदार कौतुक होत आहे. त्यांनी सर्वांना होत जोडून नमस्कार करत, फ्लाईंग किस करत सर्वांचेच आभार मानले. त्यांच्या साठी हा क्षण फार मोठा होता. त्यांच्या डोळ्यातील अश्रू त्यांच्यासाठी हा क्षण किती आनंदाचा होता, हे कळतं.
तब्बल ३० वर्षांनंतरच्या मोठ्या काळानंतर ‘ऑल वी इमेजिन ॲज लाईट’ हा भारतीय चित्रपट कान्स फेस्टिव्हलमध्ये स्पर्धेत आहे. ‘ऑल वी इमेजिन ॲज लाईट’ मध्ये प्रमुख भूमिकेत छाया कदमसह कनी कुसृती, दिव्या प्रभा आणि हृदू हॅरॉन हे कलाकार आहेत. छाया कदम यांचे २०२४ मध्ये अनेक बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेले आहेत. ‘मडगाव एक्सप्रेस’ आणि ‘लापता लेडीज’ सारख्या चित्रपटात त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘सैराट’, ‘फॅन्ड्री’, ‘न्यूड’ आणि ‘रेडू’ सारखे अनेक हिट चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.