Sridevi  Saam tv
मनोरंजन बातम्या

Sridevi Death Case : श्रीदेवी मृत्यू प्रकरणात PM मोदींच्या बनावट पत्राचा हवाला, सीबीआयने स्वयंघोषित गुप्तहेराविरोधात उचलले मोठे पाऊल

Sridevi Death Case News: युट्यूबरने या प्रकरणात दावा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासहित अन्य मंत्र्यांच्या बनावट दाखल्याचा हवाला दिला आहे. यानंतर सीबीआयने एका स्वंयघोषित गुप्तहेराविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

Vishal Gangurde

Sridevi Death Case News:

श्रीदेवी मृत्यूप्रकरणात एका युट्यूबरने एक खळबजनक दावा केला. या युट्यूबरने या प्रकरणात दावा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासहित अन्य मंत्र्यांच्या बनावट दाखल्याचा हवाला दिला आहे. यानंतर सीबीआयने एका स्वंयघोषित गुप्तहेराविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. (Latest Marathi News)

मीडिया रिपोर्टनुसार, सीबीआयने गेल्या वर्षी वकील चांदनी शाह यांच्या तक्रारीनंतर भुवनेश्वरच्या दीप्ती आर पिन्नीती आणि वकील भरत सुरेश कामथ यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. हे प्रकरण पंतप्रधान कार्यालयाकडून यंत्रणेला पाठविण्यात आलं होतं.

चांदनी शाह यांनी आरोप केले होते की, श्रीदेवी मृत्यूप्रकरणात दीप्तीने अनेक बनवाट पत्रांचा हवाला दिला होता. त्यात पंतप्रधान, संरक्षण मंत्री, सुप्रीम कोर्टशी संबंधित कागदपत्रे आणि यूएई सरकारच्या अनेक दस्तऐवजाचा सामावेश होता. सादर केलेले सर्व पत्र हे बनावट होते'.

श्रीदेवी आणि सुशांत सिंह राजपूत सारख्या बॉलिवूड कलाकारांच्या मृत्यूबाबत खळबळजनक दावा केला होता. फेब्रुवारी २०१८ साली दुबईत श्रीदेवीचा मृत्यू झाला होता. तिने श्रीदेवीच्या मृत्यूबाबत स्वत:च्या तपासाच्या आधारावर खळबळजनक दावा केला.

दीप्तीने एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये म्हटलं की, 'मला विश्वास करणं कठीण आहे की, सीबीआयने माझं म्हणणं न नोंदवता माझ्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. मात्र या प्रकरणात आरोप निश्चित झाले की, कोर्टात पुरावे दिले जातील'.

सीबीआयने २ डिसेंबरला भुवनेश्नरला केली घराची झडती

गेल्या वर्षी दीप्तीच्या विरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर सीबीआयने २ डिसेंबरला तिच्या घराची झडती घेतली होती. त्यावेळी मोबाईल, लॅपटॉप आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त केली होती.

श्रीदेवीचं दुबईत निधन

२०१८ साली प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीचं दुबईत निधन झालं. पुढे दीप्तीने एका मुलाखतीत श्रीदेवीच्या मृत्यूबाबत धक्कादायक दावा केला होता. त्यानंतर सीबीआयने दीप्तीच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2025 : पितृंचे तर्पण करताना लक्षात ठेवा हे नियम

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Akshay Kumar: अक्षय कुमारचा दिलदारपणा; पूरग्रस्तांना केली ५ कोटींची मदत, म्हणाला 'ही माझी...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

SCROLL FOR NEXT