Pushpa 2 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Pushpa 2 : 'पुष्पा'सोबत श्रद्धा नव्हे 'ही' अभिनेत्री लावणार ठुमके, आयटम साँगसाठी घेतलं 'इतकं' मानधन

Sreeleela : 'पुष्पा 2' या चित्रपटात आयटम साँग करण्यासाठी श्रद्धा कपूरने नकार दिला आहे. आता या जागी अल्लू अर्जुनसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री झळकणार आहे. कोण आहे ती अभिनेत्री आणि किती घेणार मानधन जाणून घ्या.

Shreya Maskar

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' (Pushpa 2) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बहुप्रतिक्षित चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना झळकणार आहे.

'पुष्पा २' चित्रपटातील आयटम साँगची सध्या चर्चा पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा २' मधील आयटम साँगसाठी बॉलिवूडचा सुपरस्टार श्रद्धा कपूरला ऑफर मिळाली होती. 'स्त्री २' च्या यशानंतर श्रद्धा कपूरला (Shraddha Kapoor ) ही ऑफर मिळाली होती. मात्र तिने ती ऑफर नाकारली आहे. त्यामुळे आता 'पुष्पा २'मध्ये आयटम साँगमध्ये कोण झळकणार हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, आता 'पुष्पा २' या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री आयटम साँगमध्ये झळकणार आहे. आता अल्लू अर्जुनसोबत (Allu Arjun) दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला (Sreeleela) ठुमके लगावणार आहे. स्वतः अल्लू अर्जुन देखील उत्कृष्ट डान्सर आहे.'पुष्पा २' साठी श्रीलीलाला या आधीही ऑफर देण्यात आली होती. तेव्हा तिने तब्बल दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. आता श्रीलीलाला या आयटम साँगसाठी किती रुपये घेत आहे याचा अद्याप खुलासा झाला नाही आहे.

श्रीलीला देखील खूप भन्नाट डान्सर आहे. याआधी देखील तिने अनेक अभिनेत्यासोबत डान्स केला आहे. 'गुंटूर करम' या चित्रपटात तिने महेश बाबूसोबत कमाल डान्स करताना ती दिसली होती. तिने आपल्या डान्सच्या शैलीने अनेकांची मने जिंकली आहेत.

'पुष्पा: द राइज' या चित्रपटात समंथा प्रभूने 'ऊ अंटावा' हे आयटम साँग केल होत. या गाण्याने संपूर्ण जगाला वेड लावलं. 'पुष्पा २' चित्रपट सुकुमार यांनी दिग्दर्शित केला आहे. 'पुष्पा २' ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: या राशींच्या आज मनातील इच्छा होतील पूर्ण; वाचा राशीभविष्य

होर्मुजमधल्या केबल्सवरुन इराणचा इशारा, तेलाच्या आगीत इंटरनेटची ठिणगी?

Maharashtra News Live Update: सागर नाईक यांनी भर सभेत महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांना सुनावले खडेबोल

ट्रम्प यांनी ओकली भारताविरोधात गरळ, ट्रम्प यांच्याकडून भारताचा नरक असा उल्लेख

MI vs CSK : हार्दिक-सूर्या फ्लॉप, पण संजू सॅमसनचं वादळ; चेन्नईने मुंबईला बालेकिल्ल्यात १०३ धावांनी चारली धूळ

SCROLL FOR NEXT