Famous Singer saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Singer: चाहती सेल्फीसाठी गेली, गायकाने आधी मिठी मारली नंतर केलं लिपलॉक; VIDEO होतोय तुफान व्हायरल

Singer Kissing Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात प्रसिद्ध गायक एका महिला चाहतीला कार्यक्रमात किस करताना दिसत आहे.

Shreya Maskar

प्रसिद्ध गायकाचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओत गायक महिला चाहतीला किस करताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

चाहते आपल्या आवडत्या कलाकाराला पाहण्यासाठी, त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी कायम प्रयत्नात असतात. ज्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. सध्या तसाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक महिला चाहती एका गायकासोबत सेल्फी काढायला गेली आणि त्या दोघांनी किस केली. या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला चाहती गायकासोबत सेल्फी काढायला आली. तेव्हा गायकाने तिच्या गालावर किस केले. त्यानंतर दोघांचा कंट्रोल सुटला आणि त्यांनी लिपलॉक केला. गायकाने चाहतील घट्ट मिठी मारली. तो काही वेळ तिला सोडत नव्हता. त्यांच्या आजूबाजूला अनेक गार्डस होते. कालांतराने दोघे भानावर आले आणि गायक स्टेजवर गेला. या सगळ्यानंतर चाहती भलतीच खुश पाहायला मिळाली.

व्हायरल व्हिडीओमधील प्रसिद्ध गायकाचे नाव Enrique Iglesias असे आहे. तो एक स्पॅनिश गायक, पॉप स्टार आहे. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 18.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. Enrique Iglesias भारतात आला आहे. त्याचे काल (30 ऑक्टोबर)ला मुंबई वांद्रे बीकेसी येथे लाईव्ह परफॉर्म शोपार पडला. या शोला मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळाली.

मीडिया रिपोर्टनुसार, Enrique Iglesias हा व्हिडीओ जुना आहे. जो आता पुन्हा व्हायरल होत आहे. यापूर्वी झालेल्या एका लाईव्ह परफॉर्मन्स वेळ हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. चाहते तुफान कमेंट्स करत आहेत. अलिकडेच असाच महिला चाहतील किस करतानाचा प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नगराध्यक्षपदाच्या तीन महिला उमेदवारांनी एकाचवेळी देवाला घातलं साकडं... आता देव कोणाला पावणार ?

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात, अपघातामध्ये चौघेजण गंभीर जखमी

Roti Making Tips : पोळपाट- लाटणं न वापरता बनवा गोल चपाती, 'ही' आहे युनिक ट्रिक

स्वच्छ आणि निर्मळ मन! कचऱ्यात सापडले 10 लाख रुपये, काकूंनी जे केले ते ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान| VIDEO

Success Story: स्वप्नपूर्ती! अवघ्या २१ व्या वर्षी मिळवली अमेरिकेत २६ लाख पॅकेजची नोकरी; शेतकऱ्याच्या लेकाचा प्रवास वाचून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT