Vijay Sethupathi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vijay Sethupathi ने वाढदिवशी चाहत्यांना दिलं मोठं गिफ्ट, 'महाराजा'चा दुसरा लूक केला शेअर

Maharaja Movie: विजय सेतुपतीच्या आगामी 'महाराजा' चित्रपटातील (Maharaja Movie) धासू लूक असलेला दुसरा पोस्टर शेअर केला आहे. विजय सेतुपतीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

Vijay Sethupathi Birthday:

श्रीराम राघवन दिग्दर्शित 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती आज आपला 16 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. विजय सेतुपतीने (Vijay Sethupathi) आपल्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास गिफ्ट दिले आहे. विजय सेतुपतीच्या आगामी 'महाराजा' चित्रपटातील (Maharaja Movie) धासू लूक असलेला दुसरा पोस्टर शेअर केला आहे. विजय सेतुपतीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

महाराजा चित्रपटातील विजय सेतुपतीचा दुसरा लूक त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेअर करण्यात आला आहे. हा फोटो पाहून अभिनेत्याच्या चाहत्यांच्या आनंदाला सीमा राहिली नाही. तसेच त्याच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्येही उत्सुकता दिसून येत आहे. अभिनेत्याचे चाहते या पोस्टवर कमेंट करून अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. याशिवाय इंडस्ट्रीतील इतर स्टार्सही सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

महाराजा चित्रपटाचे दुसरे पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये अभिनेत्याला शुभेच्छाही दिल्या. निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'भयंकर आणि अत्यंत शक्तिशाली #महाराजा स्पेशल सेकंड लुक पोस्टर; आमचे प्रिय मक्कल सेल्वन @VijaySethuOffl यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. @Dir_Nithilan' यांनी लिखित आणि दिग्दर्शित केले आहे.'

महाराजा चित्रपटातील विजयच्या दुसऱ्या लूक पोस्टरमध्ये दिस आहे की, विजय चेक्स शर्टमध्ये उभा राहिलेला दिसत आहे. तसेच त्याच्या डोक्यातून रक्त येत आहे. पोस्टरमध्ये अभिनेत्याचे खूपच गंभीर रूप दिसत आहे. अभिनेत्याचा हा लूक प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. 'महाराजा' हा विजय सेतुपतीचा ५० वा चित्रपट आहे.

निथिलन स्वामीनाथन दिग्दर्शित या चित्रपटात ममता मोहनदास, अभिरामी, अनुराग कश्यप, भारती राजा, मुन्शिकांत आणि इतर कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. दरम्यान, विजय सेतुपती सध्या 12 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या 'मेरी ख्रिसमस' या हिंदी-तमिळ चित्रपटात दिसत आहे. या चित्रपटात कतरिना कैफ व्यतिरिक्त राधिका आपटे, विनय पाठक, संजय कपूर, राधिका सरथकुमार, गायत्री यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Moong Dal Paratha Recipe : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

SCROLL FOR NEXT