साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Devarakonda) आणि मृणाल ठाकूर यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'फॅमिली स्टार' अखेर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूर पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करत आहेत. विजय देवरकोंडाच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा आज संपली. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर मोठी गर्दी करत आहेत. (Bollywood News Marathi)
'फॅमिली स्टार' हा चित्रपट भारतात प्रदर्शित होण्याच्या एक दिवस अगोदर 4 एप्रिल रोजी यूएसएमध्ये प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद दिला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या फर्स्ट डे फर्स्ट शोला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना हा चित्रपट कसा वाटला हे शेअर करत आहेत. 'फॅमिली स्टार'चा सुरुवातीचा पहिला रिव्ह्यूही बाहेर आला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला हे आपण जाणून घेणार आहोत...
'फॅमिली स्टार' चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर रिव्ह्यू शेअर करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले की, 'फर्स्ट हाफ खूप चांगला आहे आणि चित्रपटात कॉमेडीने चांगले काम केले... विजय आणि मृणालचा चित्रपटात उत्कृष्ट अभिनय आहे. एक चांगला फॅमिली ट्रॅक चित्रपट आहे. इंटरव्हल बँगर खरोखरच जबरदस्त आहे. सेकंड हाफमध्ये सुंदरपणे काम करण्यात आले. मी या चित्रपटाला ३.५/५ असे स्टार देतो.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'फॅमिली स्टार - फर्स्ट हाफ अजूनही मनोरंजक आहे!! मला वाटते की इंटरवल ज्याप्रकारे धमाकेदार झाला आहे, उत्तरार्धात आणखी मनोरंजक क्षण असतील!' तिसऱ्या युजरने या चित्रपटाला 'कम्प्लिट फॅमिल इंटरटेन्मेंट' असे म्हटले आहे. या चित्रपटाचा स्पेशल शो पाहणाऱ्या काहींनी याला ब्लॉकबस्टरही म्हटले आहे.
दरम्यान, 'फॅमिली स्टार'च्या ट्रेलर आणि म्युझिक ट्रॅकला यापूर्वीच प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. परशुराम पेटला दिग्दर्शित फॅमिली स्टारची कथा गोवर्धनच्या जीवनाभोवती फिरते. गोवर्धन हा मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे जो आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी काहीही करू शकतो. त्यांचा अनपेक्षित रोमान्स हा चित्रपटाचा केंद्रबिंदू ठरतो. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने U/A प्रमाणपत्र दिले आहे आणि त्याची रन टाइम दोन तास त्रेचाळीस मिनिटे आहे. हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.