Salaar Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salaar Box Office Collection 2nd Day: 'सालार'ची बॉक्स ऑफिसवर जादू, दुसऱ्या दिवशी केली रेकॉर्ड ब्रेक कमाई

Priya More

Salaar Film 2nd Day Box Office Collection:

साऊथचा सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) बहुप्रतीक्षित 'सालार पार्ट 1: सीझफायर' (Salaar Movie) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. २२ डिसेंबरला रिलीज झालेल्या सालारला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या सगळीकडेच प्रभासच्या चाहत्यांमध्ये सालारची क्रेझ पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये गर्दी करत आहेत.

चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन्स आणि स्टारकास्टच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाना दिसत आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी धमाकेदार ओपनिंग केली. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी देखील दमदार कमाई (Salaar Film 2nd Day Box Office Collection) केली आहे.

रिलीजच्या दुसऱ्या दिवशीही 'सालार'ने आपल्या कमाईने खळबळ उडवून दिली आहे. 'सालार' रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कलेक्शन करेल, अशी सर्वांना अपेक्षा होती आणि हा चित्रपट तशी कमाई करताना देखील दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट शाहरुख खानच्या डंकीला टक्कर देत आहे. दोन्ही चित्रपटांमध्ये कलेक्शनच्या बाबतीत फाइट सुरू असल्याचे दिसत आहे. प्रभासचा 'सालार' कमाईच्या बाबतीत जोरामध्ये पुढे सरकताना दिसत आहे. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 'सालार'ने कमाईत मोठी झेप घेतली आहे.

Sacknilk's Early Trade नुसार, शनिवारी KGF दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या 'सालार' ने सर्व भाषांमध्ये 55 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने तब्बल 90.70 कोटींची कमाई केली. दोन दिवसांत या चित्रपटची एकूण कमाई 145.70 कोटी झाली आहे. प्रभासच्या 'सालार'ने पहिल्या दोन दिवसांत ज्याप्रकारे धमाकेदार व्यवसाय केला आहे. त्यावरून हा चित्रपट ओपनिंग वीकेंडला बॉक्स ऑफिसवर 200 कोटी रुपयांपार कमाई सहज करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

'सालार'बद्दल चाहत्यांमध्ये ज्याप्रकारे क्रेझ पाहायाला मिळत आहे. त्यानुसार हा चित्रपट येत्या काही दिवसांमुळे बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत रेकॉर्डब्रेक कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यासाठी 'सालार' हा अतिशय महत्त्वाचा चित्रपट आहे. याआधी त्याने रॉकिंग स्टार यशसोबत 'KGF 1' आणि 'KGF Chapter 2' यासारखे ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत. या दोन्ही चित्रपटांनी रेकॉर्डब्रेक कमाई केली. आता सालार देखील अशीच कमाई करेल अशी आशा दिग्दर्शकाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT