Nagarjun and Tabbu Saam Tv
मनोरंजन बातम्या

लग्नानंतरही नागार्जुन करत होता तब्बूला डेट,१० वर्षे होतं सीक्रेट अफेअर!

साऊथ सुपरस्टार नागार्जुन बॉलिवूड ब्यूटी तब्बूला बरीच वर्ष डेट करत होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : साऊथ सिनेमाने बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीला मागे टाकल आहे. बॉलिवूडचे चित्रपट फ्लॉप होत असताना साऊथचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. नागार्जुन (Nagarjun) हे साऊथ सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमधील मोठे नाव आहे. नागार्जुनने तमिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. नागार्जुनने आपल्या अभिनयाने आणि आकर्षक व्यक्तिमत्वाने भारतीय चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. नागार्जुनचे बॉलिवूडसोबत खूप एक खास नात आहे. परंतु, नागार्जुनच हे नात प्रोफेशनल नसून पर्सनल आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे की, साऊथ सुपरस्टार नागार्जुन बॉलिवूड ब्यूटी तब्बूला(Tabbu) बरीच वर्ष डेट करत होता.

नागार्जुनचे तब्बूसोबत अफेअर होते. याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तब्बू आणि नागार्जुन जवळपास १० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. परंतु, एवढ्या प्रदीर्घ नात्यानंतरही दोघांच्या प्रेमाला लग्नाची मुहूर्तमेढ मिळाली नाही. नागार्जुन आणि तब्बूच्या लव्ह लाईफमध्ये अनेक चढ-उतार आले. पण या दोन्ही स्टार्सनी त्यांच्या नात्याबद्दल कधीच प्रसार माध्यमांना काहीही सांगितले नाही.

नागार्जुन आणि तब्बूची भेट 'नाईल पल्लेदाता' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. चित्रपटादरम्यान दोघांची मैत्री झाली. कालांतराने त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही जवळपास १० वर्षे डेट करत होते. पण त्यावेळी नागार्जुन विवाहित होता. नागार्जुन त्याचे लग्न मोडण्यास तयार नव्हता, असे म्हटले जाते की, नागार्जुनचे तब्बूवरही खूप प्रेम होते. परंतु जेव्हा नागार्जुनने तब्बूला लग्नासाठी नकार दिला तेव्हा तब्बूने त्याच्यासोबत ब्रेकअप केले.

नागार्जुनने दोन विवाह केले आहेत. त्याचे पहिले लग्न लक्ष्मी दग्गुबतीसोबत झाले होते. त्याची पहिली पत्नी आणि त्याला एक मुलगा आहे, त्याचे नाव नागा चैतन्य आहे. नागार्जुन आणि लक्ष्मी यांचा १९९० मध्ये घटस्फोट झाला. यानंतर नागार्जुनने अमला अक्किनेनीशी लग्न केले. त्याची दुसरी पत्नी अमला आणि त्याला एक मुलगा आहे, त्याचे नाव निखिल अक्किनेनी आहे. नागा चैतन्य आणि निखिल अक्किनेनी साऊथचे सुपरस्टार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे प्रकरणात रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

Sunday Horoscope : तुमचा निर्णय अचूक ठरणार, अडचणींवर मात करणार; ५ राशींच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार

Tirgrahi Yog: 50 वर्षांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल त्रिग्रही योग; 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभ होणार

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

SCROLL FOR NEXT