Chiranjeevi On Ram Mandir Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chiranjeevi On Ram Mandir: राम मंदिरासाठी साऊथ सुपरस्टारचा मोठा निर्णय, 'हनुमान' चित्रपटाच्या प्रत्येक तिकिटाचे 5 रुपये करणार दान

Ram Mandhir Inauguration: चिरंजीवी यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून भक्तीचा एक अनोखा मार्ग दाखवला आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी चिरंजीवी यांनी मोठी घोषणा केली आहे.

Priya More

Hanuman Movie:

साऊथ सुपरस्टार चिरंजीवी (South Superstar Chiranjeevi) आगामी चित्रपट 'हनुमान'मुळे (Hanuman Movie) चांगलेच चर्चेत आहेत. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट येत्या १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चिरंजीवी यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून भक्तीचा एक अनोखा मार्ग दाखवला आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी चिरंजीवी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी राम मंदिरासाठी हनुमान चित्रपटाच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाच्या तिकीटाचे पैसे मंदिराच्या उभारणीसाठी दान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

राम मंदिराच्या उभारणीसाठी हनुमान चित्रपटाच्या विकल्या गेलेल्या प्रत्येक तिकिटातून ५ रुपये दान करण्याचा निर्णय चिरंजीवी यांनी घेतला आहे. नुकताच हैदराबादमध्ये हनुमान चित्रपटाचा प्री-रिलीज कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त चिरंजीवी यांनी चित्रपट निर्मात्यांना आवाहन केले आहे की त्यांनी चित्रपटाच्या प्रत्येक तिकिटांतून 5 रुपये अयोध्येच्या राम मंदिरासाठी समर्पित करावे. तेजा सज्जा स्टारर हनुमान चित्रपट 12 जानेवारी रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

सुपरस्टार चिरंजीवीने सांगितले की,'राम मंदिराचे बांधकाम हा इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. मला या महिन्याच्या 22 तारखेला राम मंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. मी माझ्या कुटुंबासह या कार्यक्रमाला उपस्थित राहीन.' चिरंजीवीने पुढे सांगितले की, 'हनुमानच्या टीमने देखील राम मंदिराच्या निर्माणासाठी आपले योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे. हनुमानचे निर्माता चित्रपटाच्या प्रत्येक तिकीटातून 5 रुपयांचे दान अयोध्याच्या राम मंदिरासाठी करणार आहेत. त्यांच्या या महत्वपूर्ण निर्णयासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.'

प्रशांत वर्मा यांच्या तेजा सज्जा स्टारर हनुमान चित्रपटाच्या निर्मात्याने अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी योगदान देण्यासाठी चित्रपटाच्या विकल्या गेलेल्या प्रत्येक तिकिटातून 5 रुपये दान करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे. सध्या एका युजरने लिहिले की, 'हा एक उत्तम निर्णय आहे.' दुसऱ्या एका युजरने लिहिले की, 'हे अप्रतिम आहे.' हा चित्रपट येत्या 12 जानेवारीला प्रदर्शित होणार असून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमेदवारही मैदानात

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक; तिघांचा मृत्यू

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

SCROLL FOR NEXT