South Korean Actor Jung Eun Woo passes away Saam tv
मनोरंजन बातम्या

Actor Died: प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, वयाच्या ३९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेविश्वात शोककळा

Actor Died: दक्षिण कोरियाचे अभिनेते जंग उन-वू यांच्या निधनाने चाहते दुःखी आहेत. कोरियन अभिनेत्याचे वयाच्या ३९ व्या वर्षी निधन झाले.

Shruti Vilas Kadam

Actor Died: दक्षिण कोरियाचे अभिनेते जंग उन-वू यांचे बुधवारी वयाच्या ३९ व्या वर्षी निधन झाले. त्यांचा अंत्यसंस्कार १३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. हा अभिनेता 'माय ओन्ली वन' आणि 'वेलकम टू वायकीकी २' सारख्या टीव्ही ड्रामामध्ये काम केले होते. जंग उन-वू यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्या निधनाने चाहते दुःखी आहेत. दरम्यान, त्यांच्या मृत्यूच्या एक दिवस आधी केलेल्या एका गूढ पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या पोस्टमध्ये अभिनेत्याने काय लिहिले आहे ते जाणून घ्या.

जंग उन-वू यांनी त्यांच्या शेवटच्या पोस्टमध्ये काय लिहिले?

दक्षिण कोरियाचे अभिनेते जंग उन-वू यांच्या निधनाची बातमी ऐकताच चाहत्यांना धक्का बसला. त्यानंतर काही चाहत्यांनी त्यांची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट पाहिली, यामध्ये त्यांनी लेस्ली चेउंग आणि एमी वाइनहाऊससह अनेक दिवंगत कलाकारांचे फोटो शेअर केले होते, ज्यांच्या कॅप्शनमध्ये "ईर्ष्या, आठवण आणि पश्चात्ताप" असे लिहिले होते. लेस्ली चेउंग आणि एमी वाइनहाऊस यांचेही अचानक निधन झाले. आता, कोरियन अभिनेता जंग उन-वू यांचेही अचानक निधन झाले आहे.

चाहत्यांनी या पोस्टवर काय प्रतिक्रिया दिली

कोरियन अभिनेता जंग युन-वू यांच्या शेवटच्या पोस्ट आणि मृत्यूवर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, "मी तुम्हाला चांगल्या जगात आणखी तेजस्वीपणे चमकण्यासाठीची प्रार्थना करतो." दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, "किती दुःखद! तो निरोप देत होता. त्याच्या आत्म्याला शांती लाभो."

त्याचप्रमाणे, एका चाहत्याने एक लांबलचक कमेंट केली. त्याने लिहिले, "कधीकधी जेव्हा कोणी जिवंत असते तेव्हा लोक वाईट बोलतात, दुर्लक्ष करतात. पण जेव्हा ते निघून जातात तेव्हा प्रत्येकजण अचानक त्यांच्यावर प्रेम करायला लागतात. हा विरोधाभास खूप वेदनादायक आहे.त्यांच्या आत्म्याला शांती लाभो."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वंदे भारतचे तिकिट खूपच स्वस्त, रेल्वेमंत्र्यांनी मांडलं गणित; चीन, जपान अन् फ्रान्सचा दाखला देत म्हणाले...

Matching Bangles Set: साडीवर मॅचिंग बांगड्या कश्या निवडायच्या?

Crime News : धक्कादायक! मंगळसूत्रावरून जावा-जावांची भांडणं, मोठीनं छोट्या जावेचा जीव घेतला अन्...

Viral Video: स्टेडियममध्ये मॅच पाहताना कोल्ड्रिंक पिताय? तर हा व्हिडीओ नक्की पाहा, तुम्हालाही बसेल मोठा धक्का!

Indian Railway : राज्यातील १७ रेल्वे स्टेशनचा कायापालट झाला, १३२ स्टेशन हायफाय होणार, वाचा A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT