Prabhas New Project Saam TV
मनोरंजन बातम्या

Prabhas Video: एअरपोर्टवर प्रभासला पाहून चाहती चकीत, फोटो काढल्यानंतर अभिनेत्याच्याच गालावर मारली चापट; VIDEO होतोय व्हायरल

Prabhas Movie: प्रभास त्याच्या 'सालार' चित्रपटाच्या रिलीजसाठी सज्ज आहे.

Pooja Dange

Prabhas Viral Video:

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. त्याचे फॅन्स त्याच्यासाठी काहीही करायला तयार असतात. असाच एका फॅनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रभासला त्याच्या फॅनने उत्साहाच्याभरात गालावर चापट मारली आहे.

प्रभासचा हा व्हिडीओ चार वर्षे जुना म्हणजे २०१९ मधला आहे. प्रभासचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एअरपोर्टवरील आहे. या व्हिडीओमध्ये प्रभासची फॅन्स त्याला पाहिल्यानंतर एक्साईटेड होते. उड्या मारत ही फिमेल फॅन त्याच्याजवळ जाते आणि त्याच्यासोबत फोटो काढते.

फोटो काढल्यानंतर ती फिमेल फॅन्स पुन्हा प्रभासजवळ जाते आणि त्याच्या गालावर चापट मारून तिथून निघून जाते. प्रभासच्या फिमेल फॅनचे हे कृत्य पाहून अभिनेत्यासह त्याच्या आजूबाजूला असणारे सर्वच चकित होतात.

या व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, 'याचा इतका गाजावाजा करण्याची गरज नाही. तिने उत्साहाच्याभरात असं केलं आहे. तिने मारलं नाही. प्रभासचा कोणताही सच्चा फॅन त्याला पाहून असंच करेल.' दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंट केली आहे की, 'याचा आवाज ऐकण्यासारखा होता. लोक म्हणत आहेत तिने फक्त टच केलं.'

आणखी एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, 'तिने चापट नाही मारली. ती मुलगी वेडी आहे.' 'ठीक आहे ना, तुम्ही तुमच्या सुपरस्टारला पाहून एक्साईटेड होता. परंतु फॅननी देखील कसे वागायचे याचे भान ठेवले पहिले.' 'मी त्या जागी असते तर त्याला किस केले असते.' अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. (Latest Entertainment News)

प्रभासच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या प्रभास त्याच्या 'सालार' चित्रपटाच्या रिलीजसाठी सज्ज आहे. हा चित्रपट २२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये श्रुती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि मीनाक्षी चौधरी यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय प्रभास 12 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'कल्की 2898 एडी'मध्येही दिसणार आहे. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबईतील आझाद मैदानमध्ये मविआचे आंदोलन

Crime: अल्पवयीन मुलीचं मार्केटमधून अपहरण, कारमध्ये सामूहिक बलात्कार; १० तास ओलिस ठेवलं नंतर...

Local Body Election : निवडणुकीआधी शरद पवारांना जोरदार धक्का, २ विश्वासू शिलेदारांचा राष्ट्रवादीला रामराम

Ajit Pawar setback : अजित पवारांना जोरदार धक्का, ४३ पदाधिकार्‍यांचा एकच वेळी 'जय महाराष्ट्र', निवडणुकीआधी राष्ट्रवादीला खिंडार

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला मंजूरी तर मिळाली, पण कधीपासून लागू होणार? संभाव्य तारीख वाचा

SCROLL FOR NEXT