Rashmika Mandanna Saam TV
मनोरंजन बातम्या

Forbes India 2024: 'फोर्ब्स इंडिया 30 अंडर 30' लिस्टमध्ये रश्मिका मंदान्नाचे नाव सहभागी

Rashmika Mandanna: 'गीता-गोविंदा', 'पुष्पा: द राइज' आणि 'ॲनिमल' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये रश्मिकाने काम केले असून हे तिचे चित्रपट सुपरहिट ठरले. उत्कृष्ट अभिनयाद्वारे रश्मिका नॅशनल क्रश झाली.

Priya More

Forbes India 30 Under 30 List:

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) सध्या चर्चेत आली आहे. कमी चित्रपट करूनही रश्मिका मंदान्नाने फेब्रुवारी २०२४ च्या 'फोर्ब्स इंडिया ३० अंडर ३०' च्या (Forbes India 30 Under 30) यादीत २७ वर्षीय तरुणीचे नाव कसे असू शकते हे सिद्ध करून दाखवले आहे. तरुण वयातच या अभिनेत्रीने तिच्या प्रतिभेने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे आणि त्यांची मनं जिंकली आहेत.

'गीता-गोविंदा', 'पुष्पा: द राइज' आणि 'ॲनिमल' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये रश्मिकाने काम केले असून हे तिचे चित्रपट सुपरहिट ठरले. उत्कृष्ट अभिनयाद्वारे रश्मिका नॅशनल क्रश झाली. तिने साऊथ चित्रपटामध्ये काम करता करता बॉलिवूडमध्येही दमदार एन्ट्री केली. आता प्रतिष्ठित फोर्ब्सच्या यादीत रश्मिकाच्या नावाचा समावेश झाला आहे. ही तिच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

रश्मिका मंदान्ना ही दक्षिणेतील अभिनेत्री असून ती प्रामुख्याने तेलुगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. गेल्या वर्षी तिचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. प्रथम तिने तमिळ सुपरस्टार विजयसोबत 'वामशी पैडिपल्लीच्या वारीसु' या ॲक्शन चित्रपटात काम केले. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर अंदाजे 300 कोटींची कमाई केली. दुसरे तिने शंतनू बागचीच्या हेरगिरी थ्रिलर 'मिशन मजनू'मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत भूमिका साकारली. हा चित्रपट नेटफ्लिक्स इंडियावर प्रदर्शित झाला.

तिसरं म्हणजे तिने संदीप रेड्डी वंगा यांच्या फॅमिली ड्रामा 'ॲनिमल' चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली. या चित्रपटामध्ये तिने बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूरसोबत स्क्रिन शेअर केली. हिंदी आणि तेलगूसह इतर भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर 900 कोटींहून अधिक कमाई केली. हा 2023 मधील सर्वात मोठा चित्रपट मानला जात आहे. यावर्षी रश्मिका 'पुष्पा २: द रुल', 'रेनबो', 'द गर्लफ्रेंड' आणि 'चावा' या चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT