Payal Ghosh On Mohammed Shami Saam Tv
मनोरंजन बातम्या

Payal Ghosh: मी तुझ्याशी लग्न करायला तयार, पण...; प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोहम्मद शमीला प्रपोज

Payal Ghosh On Mohammed Shami: सध्या सर्वस्तरावर त्याच्या वेगवान गोलंदाजीचे कौतुक होत आहे.

Priya More

Payal Ghosh Praposed To Mohammed Shami:

भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी (Mohammed Shami) सध्या चांगलाच चर्चेत आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये (ICC Cricket World Cup) मोहम्मद हा सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. मोहम्मद शमीने वेगवान गोलंदाजी करत भारतीय क्रिकेट संघासाठी (Indian Cricket Team) आतापर्यंत केवळ चार सामन्यांमध्ये १६ विकेट घेतल्या आहेत. सध्याच्या वर्ल्ड कपमध्ये शमीची गोलंदाजी सर्वोत्तम ठरली आहे. वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये त्याने ६ षटकांत १८ धावा देऊन ५ विकेट घेतल्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या सर्वस्तरावर त्याच्या वेगवान गोलंदाजीचे कौतुक होत आहे. संपूर्ण जगात सध्या मोहम्मदच्या गोलंदाजीची चर्चा होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीची साऊथची अभिनेत्री फॅन झाली आहे. तिने सोशल मीडियावर मोहम्मदसाठी केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

Payal Ghosh Tweet

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री पायल घोष सध्या मोहम्मद शमीच्या गोलंदाजीची जबरा फॅन झाली आहे. तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच मोहम्मद शमीला लग्नासाठी प्रपोज केला आहे. ही अभिनेत्री शमीची दुसरी बायको होण्यासाठी तयार आहे. पण तिने क्रिकेटरपुढे एक विचित्र अट ठेवली आहे. या अभिनेत्रीची पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मोहम्मद शमीची उत्कृष्ट कामगिरी पाहून पायल घोष आनंदी झाली. तिने मोहम्मद शमीसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. पायल घोषने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच ट्विटरवर पोस्ट करत शमीला प्रपोज केला आहे. तिने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, शमी तू तुझं इंग्लिश सुधार, मी तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहे.’ यासोबतच तिने या पोस्टमध्ये हास्याचा इमोजीही शेअर केला आहे.

पायलने लग्नासाठी मोहम्मदला प्रपोज केला खरा. पण त्यापूर्वी त्याने त्याला इंग्लिश सुधरवण्याची अट ठेवली आहे. सध्या पायल घोषणच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. ही पोस्ट व्हायरल होत आहे. दरम्यान, पायल घोषचा जन्म १९९२ मध्ये कोलकाता येथे झाला होता.

तिने सेंट पॉल मिशन स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आणि स्कॉटिश चर्च कॉलेजमधून राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली. तिची अभिनयाची आवड पूर्ण करण्यासाठी ती कॉलेजमध्ये असताना घरातून पळून मुंबईत आली आणि तेव्हापासून तिची अभिनय कारकीर्द सुरू झाली. तिने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचसोबत पायलने कॅनडियन चित्रपटात देखील काम केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT