Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

साउथ अभिनेत्याची मेहुणी गाजवणार Bigg Boss 18चं पर्व; केली धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Bigg Boss 18 : 'बिग बॉस 18' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शोमध्ये साउथ अभिनेत्याची मेहुणी झळकणार आहे. जाणून घ्या कोण?

Shreya Maskar

6 ऑक्टोबरपासून सलमान खानचा 'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमानचे चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शोमध्ये कोणते कलाकार येणार याची चर्चा रंगली आहे.

'बिग बॉस 18' नवीन प्रोमो आला आहे. जे पाहून प्रेक्षकांना खूप आनंद झाला आहे. 'बिग बॉस 18' च्या घरात 90 च्या दशकातील सुपरस्टार येणार आहे. ही सुपरस्टार दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूड आणि टिव्ही गाजवणारी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर आहे. शिल्पा शिरोडकर दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूची (Mahesh Babu) मेहुणी आहे.

शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar) यांनी 90 चे दशक गाजवले आहे. ती व्हिडिओमध्ये बोलताना दिसते की, "लोक मला 90 च्या दशकातील राणी म्हणतात. मी सर्व मोठ्या हिरोसोबत काम केले. अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, गोविंदा, अक्षय कुमार, शाहरुख खान, फक्त एक स्वप्न होते की सलमानसोबत (salman khan) काम करायचे आज माझे ते ही स्वप्न पूर्ण होत आहे. " शिल्पा शिरोडकर घरात कसा गेम खेळणार पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

शिल्पा शिरोडकर आता 'बिग बॉस 18' मध्ये दिसणार म्हणून प्रेक्षक उत्साहात आहेत. त्याच्या व्हिडिओवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. 'बिग बॉस 18' तुम्हाला 6 ऑक्टोबर पासून रात्री 9 वाजता पाहता येणार आहे. यावेळी बिग बॉसची थीम वेळेवर आधारित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मी सुनेत्रा अजित पवार....; महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

Hair Fall Control: केस होतील मुलायम अन् मजबूत; रोज फॉलो करा ही १ ट्रिक

Gram Panchaya Elections: राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका कधी होणार? तारखेबाबत महत्वाची अपडेट

गर्लफ्रेंडला घरी बोलावलं, नंतर दोन मित्रांसह सामूहिक बलात्कार; 14 वर्षीय पीडित मुलीने विष पिऊन आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT