South Actor Kollam Sudhi Death Instagram
मनोरंजन बातम्या

South Actor Dies: टॉलिवूडवर शोककळा! या प्रसिद्ध अभिनेत्याचा कार अपघातात मृत्यू, 3 सहकलाकार गंभीर जखमी...

Kollam Sudhi Passes Away : मल्याळम अभिनेता कोल्लम सुधी यांच्या कारला अपघात झाला आहे. कार अपघातात अभिनेत्याला आपला जीव गमवावा लागला आहे.

Chetan Bodke

South Actor Kollam Sudhi Death: गेल्या काही दिवसांपासून भारतीय चित्रपटसृष्टीत एकामागून एक दु:खद घटना घडत आहे. गेल्या सहा दिवसातच चारक कलाकारांनी अचानक जगाचा निरोप घेतला. यामध्ये चित्रपटसृष्टीपासून ते टेलिव्हिजनमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांचा समावेश होता. अशातच पुन्हा एकदा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून दु:खद बातमी समोर येत आहे. मल्याळम अभिनेता कोल्लम सुधी यांच्या कारला अपघात झाला आहे. कार अपघातात अभिनेत्याला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यांच्या सोबत अन्य तीन कलाकार देखील होते, त्या अपघातात ते जखमी झाले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 37 वर्षीय कोल्लम सुधी यांच्या कारला सोमवारी पहाटे 4:30 च्या सुमारास त्रिशूरमधील कपमंगलम येथे अपघात झाला. सुधी वाटकारा येथील कार्यक्रमानंतर कोल्लम घरी परतत होते आणि कॉमेडियन बिनू आदिमाली, उल्लास आणि महेश हे सेलिब्रिटी देखील त्यांच्यासोबत होते. (Tollywood)

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्लम सुधी यांची कार विरुद्ध दिशेने येत असलेल्या कपमंगलम येथे एका ट्रकला धडकली. या अपघातात कोल्लम सुधी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना थिसुरमधील कोडुंगल्लूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, उपचारादरम्यानच अभिनेत्याचे निधन झाले. दुसरीकडे, बिनू आदिमाली, उल्लास आणि महेश हे देखील अपघातात जखमी झाले असून त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Actor)

कोल्लम सुधीने २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कंथारी'मधून टेलिव्हिजनसृष्टीत पदार्पण केले. 'कट्टापनायाले ऋत्विक रोशन', 'कुट्टनदन मारप्पा', 'थिटा रप्पई', 'वकाथिरिवू', 'ॲन इंटरनॅशनल लोकल स्टोरी', 'एस्केप', 'केसू ए वेदिंते नाधान' आणि 'स्वर्गथिले कत्तुरुम्बू' यांसारख्या चित्रपटांमध्ये तो दिसला होता. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT