मुंबई: कोरोना काळात सोनू सूदने केलेल्या कामांमुळे त्याचे सगळीकडेच कौतुक झाले आणि होत आहे. सोनू सूदने लोकांना त्यानंतरही मदत करत आहे. यासगळ्यात आपल्याला तो अभिनय क्षेत्रापासून लांब गेल्याचे दिसत आहे. बऱ्याच काळापासून तो कोणत्याही चित्रपटामध्ये दिसलेला नाही. परंतु लवकर तो फतेह चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीला येणार आहे.
सोनू सूद त्याच्या आगामी चित्रपटामध्ये एक वेगळी भूमिका साकारणार आहे. फतेह हा चित्रपट (Movie) डिजिटल युगातील घोटाळ्यांवर आधारित आहे. या चित्रपटाचे लेखन सोनू सूद करणार आहे. गेली दीड वर्ष सोनू या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहे. सोनू सूद फतेह चित्रपटातून पहिल्यांदाच लेखक म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
"आम्ही त्यावर दीड वर्षांपासून काम करत आहोत. व्यक्तिशः, मी कथेवर आणि पटकथेवर खूप काम केले आहे, मी काही चित्रपटांमध्ये सुद्धा लेखन केले आहे. पण मी पहिल्यांदाच लेखनाचे श्रेय घेणार आहे," असे सोनू सूद (Sonu Sood) याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
सोनू सूद म्हणाले की, तो फतेहसाठी एथिकल हॅकर्सशी त्याविषयी चर्चा करीत आहे कारण त्याला एक प्रामाणिक कथा सादर करायची आहे.
“हे माझ्यासाठी खूप खास आहे. मला १०० टक्के खात्री झाल्याशिवाय काही करणे बरोबर वाटत नाही. आमच्याकडे उत्तम एथिकल हॅकर्स होते जे आमच्या सोबत काम करत आहेत आणि आम्हाला योग्य माहिती देत आहात."
फतेह चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि सोनू सूदचे शक्ती सागर प्रॉडक्शन करीत आहेत. दिग्दर्शन अभिनंदन गुप्ता हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. अभिनंदन गुप्ता यांनी यापूर्वी बाजीराव मस्तानी आणि शमशेरा सारख्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. फतेह चित्रपटाचे चित्रीकरण डिसेंबरमध्ये सुरू होणार असून आणि जुलै-ऑगस्ट 2023 पर्यंत प्रदर्शित होईल. (Bollywood)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.