Sonu Sood Helps Rajpal Yadav Saam tv
मनोरंजन बातम्या

Sonu Sood Helps Rajpal Yadav: तिहार जेलमध्ये कैद असलेल्या राजपाल यादवच्या मदतीला आला सोनू सूद; म्हणाला, 'दान नाही तर आदर...'

Sonu Sood Helps Rajpal Yadav: चेक-बाउन्स प्रकरणात अडकलेला बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव तिहार तुरुंगात आहे. आता, अभिनेता सोनू सूदने त्याच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

Shruti Vilas Kadam

Sonu Sood Helps Rajpal Yadav: चेक बाउन्स प्रकरणात अडकलेला बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव याला नुकताच दिल्लीच्या तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावे लागले. आत्मसमर्पण करण्यापूर्वी तो खूप भावूक झाला आणि त्याने स्पष्टपणे सांगितले की त्याच्याकडे पैसे नाहीत. आता बॉलीवूडचा 'रियल हीरो' म्हणून ओळखला जाणारा सोनू सूद पुन्हा एकदा पुढे आला आहे आणि या प्रकरणात राजपाल यादवला मदत करणार आहे.

२०१० च्या चेक बाउन्स प्रकरणात ५ कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यास असमर्थ अभिनेता राजपालने अखेर आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण करण्यापूर्वी तो खूप भावनिक झाला आणि अधिकाऱ्यांना म्हणाला, "साहेब, मी काय करु? माझ्याकडे पैसे नाहीत. मला दुसरा कोणताही मार्ग दिसत नाही. येथे सर्वजण एकटे आहेत, माझा कोणीही मित्र नाहीत. मला स्वतःला या संकटातून बाहेर पडावे लागेल."

सोनू सूदने राजपाल यादवसाठी ट्विट केले

राजपाल यादवच्या या वक्तव्यावर त्याच्या चाहत्यांना फार वाईट वाटले, अखेर बॉलिवूडमधून मदतीसाठी आवाहन सुरू झाले आहे. सोनू सूदने अभिनेत्याबद्दल ट्विट केले. सोनू सूदने लिहिले, "राजपाल यादव हा एक प्रतिभावान अभिनेता आहे ज्याने आपल्या इंडस्ट्रीला अनेक वर्षांपासून उत्तम भूमिका दिल्या आहेत. कधीकधी जीवनात चुकीच्या गोष्टी घडतात कारण आपली वेळ खराब असते. तो लवकरच माझ्या चित्रपटाचा भाग असेल आणि मला वाटते की ही आपल्या सर्वांसाठी - निर्माते, दिग्दर्शक आणि सहकाऱ्यांसाठी - एकत्र येण्याची वेळ आहे."

सोनू सूद राजपाल यादवच्या मदती करणार

सोनूने अभिनेत्यासाठी आवाज उठवला, तो म्हणाला, 'भविष्यातील कामाच्या बदल्यात दिलेली एक छोटीशी रक्कम ही दान नाही तर एक आदर आहे. जेव्हा आपल्या स्वतःच्या इंडस्ट्रीचा एखादा सदस्य कठीण काळातून जात असतो, तेव्हा आपण त्यांना आठवण करून दिली पाहिजे की ते एकटे नाहीत. अशा प्रकारे आपण सिद्ध करतो की आपण फक्त एका इंडस्ट्रीपेक्षा जास्त आहोत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

साताऱ्यातील पठ्ठ्याने चक्क डोंगर फोडलाय; 67 वर्षांचा हा माऊंटन मॅन कोण?

Untitled May 06, 2026 02:29 am

SRPFच्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेचा घोटाळा? खासगी क्लासच्य़ा संचातले 100 पैकी 85 प्रश्न

पुणे पुन्हा हादरलं! ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न? नागरिक आक्रमक, घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त

नसरापूरच्या नराधमाचं क्रौर्य, बालिकेच्या तोंडात मोजा, अंगावर जखमा, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT