Sonam kapoor's Comback In Industry SaamTv
मनोरंजन बातम्या

Sonam kapoor's Comback In Industry : प्रेग्नेंसीनंतर सोनम कपूरने केली मोठी घोषणा..

Sonam Kapoor New Project : सोनम कपूर पुन्हा एकदा येणार रुपेरी पडद्यावर; सोशल मिडियावरून तिने खुलासा केला. अपडेट जाणून घ्या.

Saam Tv

अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी सोनम (Sonam Kapoor) हिने तिच्या प्रेग्नेंसीमुळे काही काळापासून रुपेरी पडद्यावर काम थांबवले होते. मात्र आता बॉलिवूड स्टार सोनम कपूर लवकरच पुन्हा काम सुरू करणार असल्याची माहिती समोर येते आहे. यासंदर्भात तिने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

सोनम पुढील वर्षाच्या सुरुवातीला आपल्या प्रेग्नेंसी नंतरच्या पहिल्या प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. हा प्रोजेक्ट एका ग्लोबल प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंग होणार आहे. घोषणा होईपर्यंत मी जास्त काही बोलू शकत नाही. हा एक मोठा प्रोजेक्ट आहे, सध्या एवढंच सांगू शकते. तथापि, या प्रोजेक्टची अधिक माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असेही तिने सांगितले आहे.

सोनम 2023 मध्ये शेवटची क्राईम-थ्रिलर 'ब्लाइंड' मध्ये दिसली होती, जो 2011 मध्ये याच नावाच्या कोरियन चित्रपटाचा रिमेक होता. शोम माखिजा दिग्दर्शित आणि सुजॉय घोष निर्मित, या चित्रपटाने 'द झोया फॅक्टर' नंतर सहा वर्षांच्या ब्रेकनंतर सोनम पुन्हा पडद्यावर परतली आहे.

पुढे, ती अनुजा चौहानच्या कादंबरीचे रूपांतर असलेल्या 'बॅटल फॉर बिट्टोरा'मध्ये काम करणार आहे. सोनम कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या 'सावरिया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अलीकडेच, सोनम कपूरला एका व्हायरल व्हिडिओमध्ये तिच्या ‘फेक ॲक्सेंट’बद्दल सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रियेचा सामना करावा लागला होता.

सोनमने काय म्हंटले आहे?

''प्रेग्नंसीनंतर पुन्हा कॅमेऱ्यासमोर येण्यासाठी मी खूपच उत्साहित आहे. मला अभिनेत्री असणे खूप आवडते आणि माझ्या प्रोफेशनमुळे अनेक रोचक पात्रांना जगणे आवडते. माणसं मला नेहमीच आकर्षित करतात आणि विविध भूमिका साकारायला मला आवडतं. मी माझ्या पुढच्या प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Election : "आमचं ठरलंय! कमळाऐवजी कपाट चिन्ह..." केडीएमसी निवडणुकीत सोशल मीडियावर खोडसाळ प्रचार, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Crime: शरीरसंबंध ठेवण्यासाठी खिडकीतून घरात घुसला, विरोध केल्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरची हत्या

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT