Sonali Kulkarni And Amruta Khanvilkar
Sonali Kulkarni And Amruta Khanvilkar  Saam TV
मनोरंजन बातम्या

'मैत्री होऊ शकली असती पण..' सोनालीने अमृता खानविलकर सोबतच्या नात्यावर सोडले मौन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सुबोध भावे (Subodh Bhave) होस्ट असलेला झी मराठीवरील (Zee Marathi) 'बस बाई बस' (Bas Bai Bas) या कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या अभिनेत्री आपली हजेरी लावतात. काल प्रदर्शित झालेल्या भागात मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) हिने आपली उपस्थिती लावली होती. सुबोधने आपल्या खास शैलीत तिला अनेक प्रश्न विचारतो. त्याच्या याच खास शैलीमुळे तो खूप नावारुपाला आला आहे.

सुबोध भावे आणि सोबत प्रवाशी असलेल्या महिलांनी सोनालीला अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि तुझ्यात वैर की मैत्री? असा प्रश्न विचारला होता. अर्थात हा प्रश्न सुबोध आणि प्रवाशी महिलांनी थेट विचारला नाही, तर कार्यक्रमात आलेल्या कलाकारांना फोटो दाखवला जातो. त्यात त्यांना खरंखरं सांगायचे असते. सोनालीला फोटो दाखवला आणि तिला सर्व खरोखर सांगावे लागले. सोनालीने अमृताचा फोटो पाहिल्यानंतर थबकत-थबकत सुरुवात केली पण त्यानंतर ती जे काही बोलली ते आश्चर्यकारक होते.

यावेळी सोनाली सांगते, 'आमच्या दोघींमध्ये वैर टोकाचे नाही पण मैत्रीही नावाला नाही. लोकांनी आम्ही वैरिणी आहेत अशा बातम्या पसरवल्या. पण आमचे खास मैत्रीसारखे नातेही नाही.आमच्यात मैत्री झाली असती तर आम्ही एकत्र चित्रपट केला असता. आम्ही एवढ्या वर्षापासून इंडस्ट्रीत एकत्र आहेत. पण आमच्या असे कधी घडले नाही. आमच्या दोघींमध्ये वैर आणि मैत्रीही नाही."

झी मराठीवरील 'बस बाई बस' कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तबगार, आपल्या कामांनी समाजात छाप उमठवणाऱ्या महिलांनी उपस्थिती लावली आहे. या शोमध्ये उपस्थित राहिलेल्या स्त्रियांना खुमासदार पद्धतीने प्रश्न विचारण्याची सुबोध भावेची खास शैली आहे. आतापर्यंत पंकजा मुंडे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुलाखती खास गाजल्या आहेत. सोनालीला विचारलेल्या उत्तरांना अमृता उत्तरे देते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Edit By- Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : रत्नागिरीत सीएनजीचा मोठा तुटवडा

Sanjay Raut: निवडणुकीनंतर सुपारीची दुकानं बंद होणार; PM मोदी- राज ठाकरेंच्या सभेवरुन संजय राऊतांची बोचरी टीका

Pune Accident News: पुण्यात भीषण अपघात! भरधाव कंटेनर उलटला, दोघांचा जागीच मृत्यू

Melghat Water Scarcity: मेळघाटात हंडाभर पाण्यासाठी आदिवासींचा जीवघेणा संघर्ष

Cannes Festival 2024 : हात फ्रॅक्चर असतानाही ऐश्वर्याची कान्स रेड कार्पेटवर रुबाबत एन्ट्री, लेक आराध्याचं होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT