सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत.
सोहम आणि पूजाचा फिल्मी स्टाइल संगीत सोहळा पार पडला आहे.
सोहम बांदेकरने रोमँटिक अंदाजात पूजाला प्रपोज केले आहे.
आदेश बांदेकरांचा लेक सोहम बांदेकर (Soham Bandekar) लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. सोहम बांदेकर अभिनेत्री पूजा बिरारीसोबत (Pooja Birari) लग्न करत आहे. आतापर्यंत मेहंदी, हळद, संगीत, साखरपुडा हे समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडले आहेत. ज्याचे व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.
सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांचा संगीत सोहळा खूप थाटामाटात पार पडला आहे. संगीत सोहळ्याला पूजा बिरारीने बेभान होऊन डान्स केला. तर सोहम बांदेकर आणि पूजा बिरारीचा रोमँटिक डान्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी 'मुझसे शादी करोगी...' या गाण्यावरती रोमँटिक डान्स केला. त्यानंतर सोहम बांदेकरने फिल्मी अंदाजात पूजा बिरारीला प्रपोज केला. त्यांच्या संगीत सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'राजश्री मराठी' संगीत सोहळ्याचे फोटो व्हिडीओ शेअर केले आहेत.
पूजा बिरारीने केळवण समारंभात खूप खास उखाणा घेऊन आपल्या नात्याची कबुली दिली. पूजा उखाणा घेत म्हणाली, घरात चालले मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर, माझे अहो म्हणजे सोहम होणार माझे मिस्टर" त्यानंतर पूजाच्या हातावर सोहमच्या नावाची मेहंदी रंगली आहे. त्यानंतर पूजा आणि सोहम हळदीत माखले. चाहते आणि कलाकार मंडळींकडून पूजा आणि सोहमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांचे लोणावळ्यातील रिसॉर्टमध्ये शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. या लग्न सोहळ्याला अनेक कलाकार पाहायला मिळत आहे. संगीत समारंभाला पूजाने सिव्हर वेस्टर्न साडी नेसली होती. तर सोहमनेही सिल्व्हर आऊटफिट परिधान केला होता. पूजा बिरारी सध्या 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.