Ankita Walawalkar Mumbai Kokan Shocking Experience Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita Walawalkar News: मुंबई-कोकण प्रवासात भयंकर दृश्य दिसलं, चकवा अन् बरेच खतरनाक अनुभव; कोकण हार्टेड गर्लनं सांगितला थरारक अनुभव

Ankita Walawalkar Mumbai Kokan Shocking Experience: अंकिताने चाहत्यांसोबत मुंबई- कोकण महामार्गावर घडलेला एक धक्कादायक किस्सा ब्लॉगच्या माध्यमातून शेअर केला आहे.

Chetan Bodke

Ankita Walawalkar Had A Shocking Experience On The Road: सोशल मीडियावर इन्फ्लूएंसर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर कायमच चर्चेत असते. अंकिता नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ चर्चेत असतात. अंकिता कायमच यु ट्यूबवर ब्लॉगच्या माध्यमातून चर्चेत असते. नुकतच अंकिताने चाहत्यांसोबत मुंबई- कोकण महामार्गावर घडलेला एक धक्कादायक किस्सा ब्लॉगच्या माध्यमातून शेअर केला आहे. सध्या तिचा हा धक्कादायक किस्सा कमालीचा चर्चेत आला आहे, तो ऐकून कदाचित तुम्हालाही धक्का बसेल, चला तर जाणून घेऊया तिच्या सोबत नेमकं काय घडलं.

अंकिताने युट्युबवर तिला कोकणात जाताना आलेल्या एका भयानक अनुभवाबद्दल सांगितले. नुकताच तिने हा धक्कादायक व्हिडीओ शेअर केला असून तिचा हा व्हिडीओ कमालीचा चर्चेत आला आहे. अंकिता तिच्या युट्यूब ब्लॉगमध्ये म्हणते, “हा किस्सा मुंबई- सिंधुदुर्ग प्रवास करतानाचा आहे, मी खरंतर भूत पिशाच्च आणि इत्यादी गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. मी कायमच कोकणात जाताना गगनबावडा घाटातून जायचे. पण यावेळी आम्हाला, गुगल मॅप फोंडा घाटाच्या दिशेने घेवून गेला होता. आम्ही गगनबावडा घाटातून न जाता फोंडा घाटातून गेलो. आणि आम्हाला चकवा लागला. त्यावेळी आम्ही परत परत एकाच रस्त्यावर येत होतो. एवढंच नाही तर रस्त्यावर आम्हाला एक जळती चिता देखील दिसली.” असा किस्सा तिने सांगितला.

सोबतच ती पुढे म्हणाली, “आमच्या सोबत घडलेली ही गोष्ट मला आणि माझ्या मित्राला खूपच वेगळा अनुभव देऊन गेली. मी अनेकदा लोकांच्या तोंडून या अनेक गोष्टी ऐकायचे पण मी त्यांच्या त्या गोष्टी नेहमीच खोटं मानायचे. आमच्या सोबत जो काही किस्सा घडला तो एका स्टोरी सारखाच होता. पण आमच्यासाठी हा थ्रिलर किस्सा खूपच भयंकर होता.” असं तिने तिच्या युट्यूब ब्लॉगमध्ये चाहत्यांना सांगितले. अंकिताचा हा व्हिडीओ पाहून तिला चाहते काळजी घेण्याचे आवाहन करत असून सध्या तिचे हे वक्तव्य कमालीचे चर्चेत आहे.

अंकिताचा सोशल मीडियावर फारच मोठा चाहतावर्ग असून ती लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. ‘तूच मोरया’या गाण्याच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या भेटीला येणार असून तिचं पहिल्यांदाच तिचं हे अल्बम येत आहे. तिच्यासोबत गाण्यात सोशल मीडिया इन्फ्लूएंसर विशाल फळे सुद्धा दिसणार आहे. या गाण्याच्या माध्यमातून अंकिता वालावलकर नव्या क्षेत्रात दमदार पदार्पण करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंगोलीत मुसळधार पाऊस, इसापूरमध्ये गावकरी अडकले

बीडचा उद्योजक तरूण गर्लफ्रेंडला भेटायला सोलापुरात गेला, कारमध्ये आढळला मृतदेह; पोलिसांना वेगळाच संशय

Karishma Kapoor Children: संजय कपूरच्या प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे; करिश्मा कपूरच्या मुलांची हायकोर्टात धाव, नेमका वाद काय?

Maharashtra Tourism: नैसेर्गिक सौंदर्य अन् मनमोहक दृश्ये; मालेगावपासून हाकेच्या अंतरावर वसलंय एक सुंदर ठिकाण, एकदा भेट द्याच

Bharli Vangi Recipe : गावरान भरली वांगी, रेसिपी पाहून तोंडाला सुटेल पाणी

SCROLL FOR NEXT