Anant- Radhika Wedding Place In Gulabi Saree Song Instagram
मनोरंजन बातम्या

Anant- Radhika Wedding : अनंत- राधिकाच्या लग्नात संजू राठोडलाही आमंत्रण, 'गुलाबी साडी' गाण्यावर अंबानींसह वरातीही थिरकले...

Anant- Radhika Wedding Place In Gulabi Saree Song : अख्ख्या जगभरामध्ये चर्चेत राहिलेलं 'गुलाबी साडी' हे गाणं अनंत- राधिकाच्या लग्नात लागलं होतं. संजू राठोडच्या ह्या गाण्यावर अंबानी कुटुंबीयांसोबत अवघं बॉलिवूड थिरकलं आहे.

Chetan Bodke

जिथे तिथे सर्वत्र राधिका- अनंत यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. या सोहळ्यासाठी हॉलिवुड, बॉलिवूड, टॉलिवूड, क्रिकेटर, बिझनेसमन आणि राजकीय नेते मंडळी असे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांनी लग्नाला उपस्थित लावली होती. सध्या हे लग्न एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. ज्या ‘गुलाबी साडी’ने अख्ख्या जगाला भुरळ पाडली. ते गाणंही यावेळी लावण्यात आलं होतं. यावेळी अंबानी कुटुंबीयांसह सर्वच मान्यवरांनी या गाण्यावर जबरदस्त ठेका धरला.

विशेष म्हणजे, या लग्नासाठी जास्त मराठी सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले नव्हते. पण, गायक आणि रॅपर संजू राठोड ह्याला आवर्जुन अंबानी फॅमिलीने आमंत्रित केले होते. संजू राठोडने लग्नामध्ये उपस्थिती लावत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी संजूने ‘गुलाबी साडी’ हे गाणं गात सर्वांनाच ठेका धरायला भाग पाडले. सध्या लग्नातील अनेक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर जोरदार व्हायरल होत आहे. संजू राठोडने यापूर्वी एकदा आयपीएलच्या हंगामात स्टेडियमवरही हे गाणं गायलं होतं.

संजू राठोडचं ‘गुलाबी साडी’ हे गाणं न्यूयॉर्कच्या टाईम स्क्वेअरच्या बिलबोर्डवरही झळकलेलं आहे. संजु राठोडचं ‘गुलाबी साडी’हे गाणं फेब्रुवारी २०२४ मध्ये सोशल मीडियावर रिलीज झालेलं आहे. हे गाणं क्षणातच प्रत्येकाच्या मोबाईलवर तुफान व्हायरल झालं गाण्याला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत असून या गाण्याला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत.

शिवाय, ह्या गाण्याचा ग्लोबल टॉप म्युझिक व्हिडिओमध्येही समावेश झाला आहे. हे गाणं संजू राठोडने स्वत: लिहिले असून आवाजही त्यानेच दिला आहे. गाण्यामध्ये प्रमुख भूमिकेत संजू राठोड आणि प्राजक्ता आहेत. गाण्यावर अजूनही नेटकरी व्हिडिओ बनवताना दिसतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मनसेने छापले खास टीशर्ट, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Hockey Asia Cup: पाकिस्तान खेळणार 'आशिया कप', हॉकी संघ भारतात येणार: क्रीडा मंत्रालयाचा हिरवा कंदील

Underi : उंदेरी किल्ला कधी पाहिला का? पावसाळ्यात ट्रिप प्लान कराच

Marathi Vijay Melava : "गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरला आहे"; ठाकरेंचा फडणवीस सरकारवर टीकेचा बाण

SCROLL FOR NEXT