Sobhita Dhulipala SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sobhita Dhulipala : साखरपुडा झाल्यानंतर शोभिता भलतीच खूश; चमचम करणाऱ्या इंगेजमेंट रिंगकडे वळल्या अनेकांच्या नजरा

Sobhita Dhulipala Flaunts Her Engagement ring : शोभिता धुलिपालाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नवीन फोटो शेअर केले आहेत. ज्यात शोभिता आपली इंगेजमेंटची अंगठी फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

Shreya Maskar

साऊथ सुपरस्टार नागा चैतन्य (Naga Chaitany) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. त्याच्या प्रत्येक चित्रपटात भन्नाट अभिनय पाहायला मिळतो. ह्या सुपरस्टाराने नुकतच शोभिता धुलिपालाशीसोबत साखरपुडा केला. नागा चैतन्य आणि शोभिता (Sobhita Dhulipala) आधीपासूनच एकमेकांना डेट करत होते. त्यांचा साखरपुडा हैदराबादमध्ये ८ ऑगस्टला थाटात पार पडला. सध्या हे नवे जोडपे सोशल मिडियावर खूप चर्चेत आहे. चाहते या दोघांवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. आता चाहत्यांना त्यांच्या लग्नसोहळ्याची उत्सुकता लागली आहे.

शोभिता धुलिपालाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर साडीतील खास फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये शोभिता साखरपुड्याची अंगठी फ्लॉन्ट (Engagement ring) करताना दिसत आहे. शोभिताचे हे फोटो एका इव्हेंटमधील आहे. या साडीमध्ये अभिनेत्रीचे सौंदर्य खुललं आहे. या फोटोमध्ये शोभिताच्या हाताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या बोटातील अंगठीची चमक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. शोभिताच्या बोटातील इंगेजमेंटच्या हिऱ्याच्या अंगठीवर लोकांचे विशेष लक्ष गेल आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे. अनेक कलाकारांनी तसेच स्वतः नागा चैतन्य देखील फोटोंना लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

शोभिताने तिच्या इंस्टाग्राम अंकाउटवर साखरपुड्याचे फोटो देखील शेअर केले होते. या फोटोमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत होते. या फोटोंमध्ये त्यांचा पारंपारिक लूक पाहायला मिळाला. शोभिताने सुंदर साडी नेसली होती तर नागा चैतन्यने कुर्ता घातला होता. अभिनेत्रीने मिनिमल मेकअप करून हा लूक पूर्ण केला आहे. या फोटोंवर देखील चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला.

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. त्यामुळे ते त्यांच्या लग्नाची आतूरतेने वाट पाहत आहेत. नागा चैतन्यने एका इवेंट दरम्यान सांगितले की, त्याला सिंपल पद्धतीने लग्न करायचे आहे. फक्त महत्त्वाची लोक असणे गरजेचे आहे. मोठे थाटामाटात लग्न नसावे, संस्कृती आणि परंपरा लक्षात राहणारे लग्न असावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

SCROLL FOR NEXT