Shreya Maskar
आजकाल स्त्री-पुरुष दोघांनच्याही बोटात अंगठी असल्याचे पाहायला मिळते.
काही लोक फॅशन आणि ट्रेंडच्या नावावर अंगठी घालतात तर काहींना अंगठी घालायची सवय लागली असेत.
ही फॅशन किंवा सवय आपल्या आरोग्याला मात्र खूप घातक ठरू शकते.
बोटामध्ये दीर्घकाळ खूप घट्ट बसणारी अंगठी घातल्यास 'एम्बेडेड रिंग सिंड्रोम' ही समस्या उद्भवू शकते.
बोटामध्ये घट्ट अंगठी घातल्यास बोट आखडली जातात.
घट्ट अंगठी घातल्यामुळे बोटाला संसर्ग होण्याचा धोका वाढतो आणि पुढे हा संसर्ग हातालाही होऊ शकतो. जे आरोग्याच्या दृष्टीने खूपच घातक आहे.
घट्ट अंगठी घातल्यास बोटांच्या नसा दबल्या जातात आणि बोटाला सूज येते.
घट्ट अंगठीमुळे बोटांना खाज येते आणि जळजळही होते. तसेच अंगठी घातलेल्या भाग काळा पडतो आणि बोटाची साले देखील निघतात.
बोटाला घट्ट बसणारी अंगठी घालणे टाळा. तसेच कोणतीही अंगठी दीर्घकाळ घालून ठेवू नका. अंगठी घातलेल्या बोटाला कोणताही संसर्ग झाल्यास त्वरित डॉक्टरशी संपर्क साधा.
ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.