Shreya Maskar
वास्तुशास्त्रानुसार मनगटावरील घड्याळ नीट परिधान करणे महत्त्वाचे आहे. यामुळे आयुष्यातील अडथळे दूर होतात.
मनगटावरील घड्याळ्यातून माणसाला सकारात्मक तसेच नकारात्मक देखील ऊर्जा मिळते. त्यामुळे घड्याळ घालताना 'या' नियमांचे पालन करावे.
वास्तुशास्त्रानुसार सोनेरी आणि चंदेरी रंगाचे घड्याळ घालणे शुभ मानले जाते.
मनगटाला योग्य पद्धतीने बसेल असेच घड्याळ घालावे. सैल घड्याळ घातल्यास एका गोष्टीवर तुमचे लक्ष केंद्रित होत नाही.
घट्ट घड्याळ घातल्यास तुमच्या करिअरमध्ये अडथळे येऊ शकतात. त्यामुळे घड्याळ मनगटाला नीट बसणे महत्त्वाचे आहे.
गोलकार आणि चौकोनी आकाराची डायल शुभ मानली जाते.
मोठे डायल असलेले घड्याळ घालू नये. त्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अडचणी येऊ शकतात.
वास्तुशास्त्रानुसार डाव्या हातात घड्याळ घालणे शुभ मानले जाते.
ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.