HBD Sobhita Dhulipala SAAM TV
मनोरंजन बातम्या

HBD Sobhita Dhulipala : नागा चैतन्यच्या बायकोचा स्वॅगच लय भारी; शोभिताच्या दिलखेच अदा, पाहा PHOTOS

Sobhita Dhulipala Photos : आज शोभिता धुलिपालाचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त तिच्या स्टायलिश लूकची एक झलक पाहूया.

Shreya Maskar

साऊथ सुपरस्टार नागा चैतन्यची बायको शोभिता धुलिपालाचा (Sobhita Dhulipala) आज (31 मे) वाढदिवस आहे. आज शोभिता धुलिपाला 33 वर्षांची झाली आहे. 2024 मध्ये नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाने लग्नगाठ बांधली. शोभिता धुलिपाला कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ ती कायम चाहत्यांसोबत शेअर करत असते.

शोभिता धुलिपालाच्या सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत. ती एक उत्तम अभिनेत्री देखील आहे. अभिनयाच्या दुनियेत आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सने तिने सर्वांची मने जिंकली आहे. शोभिता पारंपरिक साड्यांपासून ते मॉडर्न गाऊन्सपर्यंत तिचा प्रत्येक लूक एक परफेक्ट स्टाईल स्टेटमेंट ठरतो. आज तिच्या वाढदिवसानिमित्त ग्लॅमरस लूकची एक झलक पाहूया.

साडीतला देखणा साज

शोभिता धुलिपाला साडीत खूप रॉयल दिसते. तिच्या ऑलिव्ह ग्रीन टिश्यू साडीतील लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ड्रमॅटिक, सुंदर दागिन्यांनी तिच्या लूकला उठाव दिला आहे. तर मिनिमल मेकअपने तिचे सौंदर्य खुललं आहे.

ग्लॅमरस अंदाज

पारंपरिकसोबतच शोभिता धुलिपाला वेस्टन लूकमध्ये देखील ग्लॅमरस दिसते. तिच्या गोल्ड बॉडीकॉन गाऊन मधील फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे. सॉफ्ट वेव्स, मेकअप आणि मिनिमल अ‍ॅक्सेसरीजमध्ये ती खूपच कमाल दिसत आहे.

वेस्टन लूक

लेपर्ड प्रिंट ड्रेसमध्ये शोभिता धुलिपालाचा फायर लूक लक्ष वेधून घेतो. तिच्या या लूकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मोकळे केस आणि मिनिमल ज्वेलरीने तिने हा लूक पूर्ण केला आहे. फोटोंमधील तिच्या कातिल अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

रॉयल स्टाइल

शोभिता धुलिपालाच्या या सुंदर ड्रेसमधून तिची रॉयल स्टाइल दिसत आहे. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. बीडवर्क आणि एम्ब्रॉयडरीने सजवलेला कुर्ता तिने परिधान केला आहे. त्यावर चुडीदार पॅन्ट, साजेसा दुपट्टा, पारंपरिक दागिने आणि केसांचा बन असा रॉयल लूक केला आहे.

मॉडर्न लूक

सॅटिनच्या मरून बॉडीकॉन ड्रेसमध्ये शोभिता धुलिपाला ग्लॅमरस वाटते. वेव्ही नेकलाइन, बोल्ड मेकअप, परफेक्ट आयब्रोज, पिंक लिप्स आणि मोकळ्या केसांमध्ये तिचा हॉट लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. फॅशनमध्ये वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या शोभिताने अनेकांची मने जिंकली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT