Shreya Maskar
आज (22 मे) शाहरुख खानच्या लेकीचा म्हणजे सुहाना खानचा वाढदिवस आहे.
आज SRKची राजकुमारी 25 वर्षांची झाली आहे.
सुहाना खानचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
सुहानाचे इन्स्टाग्रामवर 6 मिलियन फॉलोअर्स आहेत.
अभिनेत्री आपल्या वेगवेगळ्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करते.
तिच्या हॉट अन् ग्लॅमरस लूकवर चाहत्यांकडून कायमच कमेंट्सचा वर्षाव होताना पाहायला मिळतो.
सुहाना खानने 'द आर्चीज' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.
आता लवकरच बाप-लेकीची जोडी 'किंग' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.