Veer Pahariya  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Veer Pahariya : वीर पहारियाला शाळेत जायला का वाटायची लाज? सांगितला आयुष्यातील 'तो' कठीण काळ

Veer Pahariya Talk On Parental Divorce :'स्काय फोर्स' चा हिरो सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. आपल्या आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर त्याचे बालपण कसे गेले, याबद्दल वीर पहारिया काय म्हणाला जाणून घ्या.

Shreya Maskar

सध्या 'स्काय फोर्स' (Sky Force) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पाहायला मिळत आहे. तसचे 'स्काय फोर्स' मधून वीर पहारिया (Veer Pahariya) याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. वीर पहारिया हा अक्षय कुमारसोबतच मुख्य भूमिकेत आहे. वीर पहारिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. या चित्रपटात वीर पहारिया, अक्षय कुमारसोबतच निमृत कौर आणि सारा अली खान देखील पाहायला मिळत आहेत.

'स्काय फोर्स' चित्रपट 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटासाठी अक्षय कुमार आणि वीर पहारिया यांनी अनेक मुलाखती दिल्या आहेत. तसेच त्यांनी चित्रपटाचे खूप तगडे प्रमोशन देखील केले आहे. 'स्काय फोर्स' चित्रपटामुळे वीर पहारिया चांगलाच चर्चेत आला आहे. एका मुलाखतीत वीर पहारियाने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केले आहे. त्याने आपल्या कुटुंबाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

मुलाखतीत वीरने आपल्या आई-वडिलांच्या घटस्फोटाबद्दल सांगितले. आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर त्याला कोणत्या गोष्टीला सामोरे जावे लागले याचा खुलासा त्याने केला आहे. वीरने सांगितले की, "आई वडिलांच्या घटस्फोटानंतर शाळेत जायला मला लाज वाटायची. माझे बालपण खूप कठीण काळात गेले आहे. लहानपणी आपल्या पालकांचे तुटलेले नाते पाहणे कोणत्याही मुलासाठी योग्य नाही. वृत्तपत्रे न्यायालयीन कार्यवाहीबद्दल सतत तपशील देत राहायचे. मी लहान असल्यामुळे मित्रांसोबत कसे शेअर करायचे हे मला माहित नव्हते."

वीर पुढे म्हणाला, "माझ्या शाळेतील मुलं मला खूप हसायची त्यामुळे मी त्यांना काही शेअर करू शकत नव्हतो. हे सर्व माझ्यासाठी खूप त्रासदायक होते. यामुळे मला शाळेत जायची खूप लाज वाटायची आणि माझे फारसे मित्र नव्हते. बराच काळ लोक माझ्यापासून दूर राहिले. यावेळी अभिनयाने मला थेरपीप्रमाणे यावर मात करायला मदत केली.

वीर पहारियाचे आई-वडील कोण ?

वीर पहारिया हा राजकीय कुटुंबातील मुलगा आहे. त्याच्या वडीलांचे नाव संजय पहारिया आहे. तर आईचे नाव स्मृती शिंदे असे आहे. वीर पहारियाची आई महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या मुलगी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT