Sitaare Zameen Par SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sitaare Zameen Par : 'सितारे जमीन पर'चे टायटल ट्रॅक रिलीज; आमिर खान -जिनिलीयाच्या केमिस्ट्रीनं वेधलं लक्ष, पाहा VIDEO

Sitaare Zameen Par Title Track : आमिर खानचा 'सितारे जमीन पर' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच चित्रपटाचे टायटल ट्रॅक रिलीज करण्यात आले आहे.

Shreya Maskar

आमिर खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'सितारे जमीन पर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par ) 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तारे जमीन पर' या चित्रपटाचा सीक्वल आहे. या चित्रपटाचा सर्वाधिक महत्त्वाचा भाग म्हणजे आमिर खानसोबत 10 नवोदित युवा कलाकारांचा सहभाग असणार आहे. आता 'सितारे जमीन पर' चित्रपटाचे एक सुंदर गाणं रिलीज झाले आहे.

'सितारे जमीन पर' गाण्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपटात या नवीन गाण्यात आमिर खान (Aamir Khan) एका बास्केटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत असून लहान मुलांना शिस्त आणि मजेशीर पद्धतीने प्रशिक्षण देत आहे. त्यांच्या आणि मुलांच्या नात्याची झलक गाण्यात पाहायला मिळते. आमिर खान दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवत आहे

'सितारे जमीन पर' चित्रपटाच्या टायटल ट्रॅकमध्ये आमिर खान आणि जिनिलीया (Genelia ) देशमुख यांच्यातील भावनिक संवादांचेही सुंदर क्षण यात टिपले गेले आहे. चित्रपटात 10 नवोदित कलाकार अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शाहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर पाहायला मिळणार आहेत.

'सितारे जमीन पर' चित्रपटाचे दिग्दर्शन आर. एस. प्रसन्ना यांनी केले आहे.'सितारे जमीन पर' चित्रपटात आमिर खान आणि जिनिलीया देशमुख मुख्य भूमिकांमध्ये झळकणार आहे. 'सितारे जमीन पर' चित्रपट 20 जून 2025 रोजी सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात प्रेम, हास्य आणि आनंदाचा अनुभव पाहायला मिळत आहे.'सितारे जमीन पर' चित्रपटाच्या गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'सितारे जमीन पर' चित्रपटात आमिर खान आणि जिनिलीयाची भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तोडा-फोडा राज्य करा, ही यांची निती - ठाकरे

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT