Sitaare Zameen Par Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sitaare Zameen Par Collection : आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच, चित्रपट १०० कोटींच्या उंबरठ्यावर

Sitaare Zameen Par Box Office Collection Day 4 : आमिर खान आणि जिनिलियाच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवले आहे. चित्रपटाने चार दिवसांत किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात.

Shreya Maskar

आमिर खान सध्या त्याच्या 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत (Aamir Khan ) जिनिलिया (Genelia) झळकली आहे. प्रेक्षकांना आमिर आणि जिनिलियाची जोडी खूप आवडली आहे. त्यामुळे चित्रपटाला देखील उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या मनाला भावली. सोशल मीडियावर देखील सध्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाच्या गाण्यांची क्रेझ पाहायला मिळत आहे.

'सितारे जमीन पर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. हा चित्रपट आता लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करणार आहे. 'सितारे जमीन पर' हा चित्रपट 20 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात नवीन कलाकार देखील पाहायला मिळले आहेत. यात अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांचा समावेश आहे. चित्रपटाने चौथ्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमावला जाणून घेऊयात.

'सितारे जमीन पर' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4

दिवस पहिला - 10.7 कोटी रुपये

दिवस दुसरा - 21.50 कोटी रुपये

तिसरा दिवस - 29.00 कोटी रुपये

चौथा दिवस - 8.50 कोटी रुपये

एकूण - 66.65 कोटी रुपये

'तारे जमीन पर'

'सितारे जमीन पर' हा चित्रपट 2007 साली रिलीज झालेल्या 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सीक्वल आहे. चित्रपटात आमिर खान एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत दिसत आहे. जो दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवत आहे. 'सितारे जमीन पर' चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

SCROLL FOR NEXT