Sitaare Zameen Par SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Sitaare Zameen Par'ची बॉक्स ऑफिसवर जादू फेल, ११ व्या दिवशी कमाईत घसरण

Sitaare Zameen Par Box Office Collection Day 11 : आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये घट झालेली पाहायला मिळाली आहे. या चित्रपटाने ११ दिवसांत किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par') चित्रपट रिलीज होऊन आता दीड आठवडा पूर्ण झाला आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये कायम चढउतार पाहायला मिळाले आहेत. मात्र चित्रपटाने दोन्ही वीकेंडला चांगली कमाई केली आहे. 'सितारे जमीन पर' चित्रपटात आमिर खान (Aamir Khan ) मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. 'सितारे जमीन पर' हा चित्रपट 20 जूनला रिलीज झाला आहे. चित्रपटाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'सितारे जमीन पर' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 11

  • दिवस पहिला - 10.7 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 21.50 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 29.00 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 8.5 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 8.50 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 7.25 कोटी रुपये

  • सातवा दिवस - 6.5 कोटी रुपये

  • आठवा दिवस - 6.65 कोटी रुपये

  • नववा दिवस - 12.6 कोटी रुपये

  • दहावा दिवस - 14.50 कोटी रुपये

  • अकरावा दिवस - 3.27 कोटी रुपये

  • एकूण - 126.4 कोटी रुपये

'सितारे जमीन पर' जगभरातील कमाई

आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 198 कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. लवकरच चित्रपट 200 कोटी पार करणार आहे. हा चित्रपट शिक्षक आणि मुलांच्या नात्यावर आधारित आहे

'सितारे जमीन पर'मध्ये आमिर खानसोबत जिनिलिया देखील झळकली आहे. या चित्रपटातील गाणी चाहत्यांना खूप आवडली आहे. तसेच चित्रपटातील आमिर आणि जिनिलियाच्या केमिस्ट्रीने चाहत्यांना भुरळ घातली आहे. 'सितारे जमीन पर' हा चित्रपट 2007 साली रिलीज झालेल्या 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सीक्वल आहे. चित्रपटात आमिर खान एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत दिसत आहे.

'सितारे जमीन पर' स्टारकास्ट

'सितारे जमीन पर' चित्रपटात 10 नवीन कलाकार पाहायला मिळत आहेत. यात अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर यांचा समावेश आहे. प्रेक्षकांकडून चित्रपटासाठी चांगला प्रतिसाद येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF Balance Check: आता इंटरनेटशिवायही काही सेकंदात पीएफ बॅलन्स चेक करु शकता, कसं? वाचा

मुख्यमंत्र्यांच्या 'Flying Squad'चा जुगार अड्ड्यावर छापा! ५५ गॅम्बलरला अटक; १२ लाख रोकड, ४६ मोबाईल अन् डझनभर गाड्या जप्त

America : हेलिकॉप्टरमधून पाडला नोटांचा पाऊस, मुलाने केली वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण | VIDEO

Delhi Car Theft News : वाहन चालकांनो सावधान! फक्त ६० सेकंदात चोरली महागडी कार; व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Maharashtra Live News Update: राज्यातील धरणांमधील आवक वाढली, रायगडातील 17 धरणं फुल्ल

SCROLL FOR NEXT