Sitaare Zameen Par Collection  SAAM TV
मनोरंजन बातम्या

'Sitaare Zameen Par'ची बॉक्स ऑफिसवर जादू, १० दिवसांत छप्परफाड कमाई

Sitaare Zameen Par Box Office Collection Day 10: आमिर खान आणि जिनिलियाच्या 'सितारे जमीन पर' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने 10 दिवसांत किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

आमिर खानचा (Aamir Khan ) 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) रिलीज होऊन आता 10 दिवस पूर्ण झाले आहेत. आमिर आणि जिनिलियाचा 'सितारे जमीन पर' चित्रपट 20 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या रविवारच्या कलेक्शमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. चित्रपटाचे आता पर्यंतचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'सितारे जमीन पर' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 10

  • दिवस पहिला - 10.7 कोटी रुपये

  • दिवस दुसरा - 21.50 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 29.00 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 8.5 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 8.50 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 7.25 कोटी रुपये

  • सातवा दिवस - 6.5 कोटी रुपये

  • आठवा दिवस - 6.65 कोटी रुपये

  • नववा दिवस - 12.6 कोटी रुपये

  • दहावा दिवस - 14.50 कोटी रुपये

  • एकूण - 122.65 कोटी रुपये

'सितार जमीन पर'नं 'गजनी'ला टाकले मागे

'सितार जमीन पर' रिलीज होऊन आता दहा दिवस पू्र्ण झाले आहेत. दहा दिवसांत 'सितार जमीन पर'अनेक चित्रपटांना मागे टाकून रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. 'सितार जमीन पर' आतापर्यंत 122.65 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. 'सितार जमीन पर' आमिर खानच्या 'गजनी' सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. 'गजनी'चित्रपटाने 114 कोटी रुपयांचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला आहे. आता भविष्यात 'सितार जमीन पर' चित्रपट किती कमाई करतो आणि कोणत्या चित्रपटांना कलेक्शनमध्ये मागे टाकतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'सितारे जमीन पर'

'सितारे जमीन पर' हा चित्रपट 2007 साली रिलीज झालेल्या 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सीक्वल आहे. चित्रपटात आमिर खान एका बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत दिसत आहे. जो दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवत आहे. 'सितारे जमीन पर' चित्रपटाचे दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reel Stunt Alert : रिलस्टारला खाकीचा दणका! बाईकवर स्टंटबाजी करणं आलं अंगलट, २२ हजारांचा दंड वसूल

Miraj News : भर रस्त्यावर रस्त्यावर खिळे टोचून टाकला लिंबू; अंधश्रध्येतुन प्रकार, नागरिकांमध्ये भीती

Maharashtra Live News Update: फडणवीस सरकारचा आणखी एक मोठा निर्णय; २२ उपजिल्हाधिकाऱ्यांची बढती होणार

Maharashtra Politics: पंढरपुरमध्ये CM फडणवीस यांचा मास्टरस्ट्रोक, ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर

क्रिकेट खेळताना भयंकर घडलं, पोटाला बॅट लागली अन् जागीच कोसळला, १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT