Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3: रूह बाबा की सिंघम, बॉक्स ऑफिसवर कोणाचा डंका? छप्परफाड कमाईचा दावेदार कोण?

Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection: दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर 'भूल भुलैया 3' आणि 'सिंघम अगेन' हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या धमाकेदार चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर बॉलिवूडचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. रूह बाबा विरुद्ध सिंघम असा सामना बॉक्स ऑफिसवर रंगला आहे. ॲक्शन चित्रपट 'सिंघम अगेन' (Singham Again) आणि हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 3' ( Bhool Bhulaiyaa ) काल (1 नोव्हेंबर) रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रेक्षक या दोन्ही चित्रपटांसाठी उत्सुक होते. या दोन्ही चित्रपटाचे प्री-बुकिंगही जोरदार झाले होते. या दोन्ही चित्रपटांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन (Box Office Collection) जाणून घेऊयात.

'सिंघम अगेन'ने किती कमावले?

रोहित शेट्टीचा सुपर ॲक्शन चित्रपट 'सिंघम अगेन' प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरला आहे. 'सिंघम अगेन'मध्ये खूप तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. अजय देवगण (Ajay Devgn) , रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, करीना कपूर, टायगर श्रॉफ आणि अर्जून कपूर हे कलाकारांनी आपल्या अॅक्शनने 'सिंघम अगेन' गाजवला आहे. 'सिंघम अगेन' मध्ये चुलबुल पांडे म्हणजे सलमान खानचा कॅमिओ आहे. मीडिया रिपोर्टनुसार,'सिंघम अगेन' ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 43.50 कोटी रुपयांची कामाई केली आहे.

'भूल भुलैया 3'ने किती कमावले?

'भूल भुलैया 3' हा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. भुलैयाचा हा तिसरा भाग आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) , विद्या बालन, तृप्ती डिमरी आणि माधुरी दीक्षित हे मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. विद्या बालन या चित्रपटात मंजुलिकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. कार्तिक आर्यनचे रूह बाबा हे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'भूल भुलैया 3'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 35.50 कोटी रुपयांची कामाई केली आहे.

बॉक्स ऑफिसवर कोणाचा डंका?

'भूल भुलैया 3' आणि 'सिंघम अगेन' यांमध्ये पहिल्या दिवशी 'सिंघम अगेन' बाजी मारली आहे. बॉक्स ऑफिसवर सिंघमचा डंका पाहायला मिळत आहे. 'सिंघम अगेन'ने 43.50 कोटी पहिल्या दिवशी कमावले तर 'भूल भुलैया 3'ने 35.50 कोटी कमावले आहेत. सिंघम अगेनने भूल भुलैया 3ला तब्बल 8 कोटींनी मागे टाकले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: उपराष्ट्रपती निवडणुकीआधी मोठी घडामोड; 'या' दोन पक्षांचा मतदानास नकार, काय आहे कारण?

Maharashtra Live News Update: मुंब्रा येथील इमारतीच्या खोलीत मोठ्या प्रमाणावर सिलिंगचे प्लास्टर पडले

Banke Bihari Temple : मंदिरात तुफान राडा, महिला भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये हाणामारी; Video Viral

iPhone Discount Price: आयफोन झाला स्वस्त प्रत्येकाचा वाढणार स्वॅग; जाणून घ्या आयफोन १५, १६ प्लसचे नवे दर

Tuesday Horoscope : मंगळवार शुभ ठरणार की आव्हानात्मक? आजच वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT