Bigg Boss Marathi  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

Utkarsh Shinde : गायक उत्कर्ष शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अरबाजच्या खेळाचे कौतुक केले आहे. तर संग्राम चौगुलेला टोला लगावला आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi) चा खेळ दिवसेंदिवस रंगताना दिसत आहे. चाहत्यांसोबत मराठी कलाकार देखील शोचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. आपली मते तसेच प्रतिक्रिया मराठी कलाकार देत आहेत.

'बिग बॉस मराठी' नुकताच कॅप्टन्सी टास्क पार पडला. त्यातही राडा पाहायला मिळाले. या टास्कमध्ये कॅप्टन्सीमधून बाहेर काढणाऱ्याच्या घरट्यात अंडे टाकायचे होते. यात निक्की आणि अरबाजमध्ये ( Arbaz Patel ) अभिजीतच्या घरट्यात अंडे टाकण्यावरून खूप वाद होतात. या टास्कमध्ये 'टीम ए' कॅप्टन टास्कच्या अंतिम फेरीत गेली. या फेरीत शेवटी अरबाज अभिजीतच्या घरट्यात अंड ठेवून त्याला कॅप्टन्सीच्या शर्यतीतून बाहेर काढतो. हा टास्कमध्ये शेवटच्या क्षणी बाजी मारून अरबाज जिंकतो. त्यामुळे सध्या अरबाजचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

मराठी गायक उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) यांनी अरबाजचे भरभरून कौतुक केले आहे. तर संग्रामला (Sangram Chougule) टोला लगावला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर स्टोरी टाकली आहे. स्टोरीत त्यांनी असे लिहिलं आहे की, " अरबाजमध्ये दम तर आहे कारण मिस्टर युनिव्हर्सला धाप लागली" त्याच्या या पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. उत्कर्ष शिंदे हा उत्तम गायक आहे. तो स्वतः सुद्धा 'बिग बॉस मराठी 3' मध्ये खेळला आहे. त्यांनी त्यात आपली रोखठोक मतं मांडली आहेत.

Utkarsh Shinde

आता या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर जाणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. या आठवड्यात अरबाज, निक्की,जान्हवी, सूरज आणि वर्षा हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT