Singer Accident Video SAAM TV
मनोरंजन बातम्या

Singer Accident Video : शुटींग सुरु असताना अख्खा सेट गायिकेच्या अंगावर कोसळला, नेमकं घडलं काय? पाहा VIDEO

Tulsi Kumar : शूटिंगदरम्यान प्रसिद्ध गायिका तुलसी कुमार हिच्या अंगावर सेट पडला आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात.

Shreya Maskar

आपण अनेक वेळा शूटिंग दरम्यान कलाकारांचा अपघात झाल्याच्या घटना ऐकतो. काही अपघात छोटे असतात. तर काही जीवघेणे ठरू शकतात. असाच एका अपघाताची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायिकेचा शूटिंग दरम्यान अपघात झाला आहे.

आपल्या सुरेल आवाजाने जगाला वेड लावणाऱ्या गायिका तुलसी कुमार (Tulsi Kumar ) हीचा शूटिंग दरम्यान अपघात (Accident ) झाला आहे. तुलसी तिच्या नवीन म्युझिक व्हिडिओचं शूट करत होती. तेव्हा एका सीनच्या दरम्यान तिला दुखापत झाली आहे. कॅमेऱ्यासमोर शूट करताना संपूर्ण सेटच तिच्या अंगावर पडला आहे. तुलसी कुमारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. सेट अंगावर पडल्यामुळे तिला जोरात मार लागला आहे.

तुम्ही पाहू शकता या व्हिडीओमध्ये तुलसी कॅमेऱ्यासमोर उभी आहे आणि तेवढ्यात तिच्या मागचा सेट तिच्यावर कोसळतो. त्यामुळे तिच्या पायाला, हाताला आणि पाठीला इजा झाल्याचे पाहायला मिळत आहे. तुलसी सक्रिय असते. त्यामुळे मोठी दुखापत होण्यापासून टळते. त्यानंतर तिथे असलेले क्रू मेंबर्स तिची काळजी घेताना दिसत आहेत. या व्हिडीओवर तुलसीचे चाहते अनेक कमेंट्स करत आहेत आणि तिच्यासाठी चिंता व्यक्त करत आहेत. तुलसी कुमारने आपल्या गायनाने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली आहे. तिने अनेक हिट गाणी दिली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tyres Black Colour : वाहनांचे रंग आणि डिझाइन बदलते, मग टायर नेहमी काळ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या रंजक कारण

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन

महायुतीत बंडखोरी? उमेदवारीच्या निर्णयावर आक्षेप घेत सामंतांच्या निकटवर्तीय नेत्यानं थोपटले दंड; शिक्षक मतदारसंघात भाजपला मोठा धक्का

Monday Horoscope : पैसा, करिअर आणि व्यवसायात मोठी संधी; ‘या’ 6 राशींचे नशीब उजळणार

तुम्हीही हेल्थ इन्शुरन्स घेतलाय? मग ही बातमी नक्की वाचा! 1 जानेवारीपासून नवा नियम येणार

SCROLL FOR NEXT