Rohit Raut saam tv
मनोरंजन बातम्या

Rohit Raut : मराठमोळ्या रोहित राऊतचा स्वॅग लय भारी! ठरला भारताचा पहिला 'I-पॉपस्टार'

Rohit Raut India First I Popstar : गायक रोहित राऊत हा भारताचा पहिला 'I-पॉपस्टार' ठरला आहे. सध्या त्याच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याला बक्षिसात काय मिळाले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'I-पॉपस्टार' चा अंतिम सोहळा पार पडला आहे.

मराठमोळा रोहित राऊत भारताचा पहिला 'I-पॉपस्टार' ठरला आहे.

सर्वत्र रोहितने मिळवलेल्या यशाचे कौतुक होत आहे.

'I-पॉपस्टार' हा संगीत रिॲलिटी शो खूप काळापासून चांगलाच चर्चेत होता. त्यात कलाकारांनी गायलेली गाणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत होती. अशात नुकताच 'I-पॉपस्टार' शो चा अंतिम सोहळा पार पडला आहे. भारताला आपला पहिला 'I-पॉपस्टार' भेटला आहे. भारताचा पहिला 'I-पॉपस्टार' बनण्याचा मान मराठमोळा गायक रोहित राऊतने पटकवला आहे. 'I-पॉपस्टार'चा रोहित राऊत विजेता ठरला आहे.

'I-पॉपस्टार' हा शो ॲमेझॉन एमएक्स प्लेयरवर पाहायला मिळतो. रोहित राऊतने मिळवलेल्या या घवघवीत यशानंतर त्याचे सर्वत्र कौतुक होत आहेत. चाहते, कलाकार मंडळी त्याला शुभेच्छा देताना दिसत आहेत. रोहित राऊतने आजवर अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. त्याच्या आवाजाचे चाहते दिवाने आहेत. टॉप 2 मध्ये टीम पर्मिशचा रोहित राऊत आणि टीम किंगचा रिषभ पांचाल पोहचले.

रोहित राऊतला 7 लाख रुपयांचं बक्षिस देण्यात आले. तर रनर अप ठरलेल्या रिषभ पांचालला 3 लाख रुपयांचं बक्षिस मिळालं. रोहित राऊतने अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. 'मराठी लिटिल चॅम्प्स' या शोमधून रोहित राऊत प्रसिद्धीच्या झोकात आला. आजवर त्यांनी अनेक चित्रपटांत गाणी गायली आहेत. तसेच मालिकांचे टायटल साँग देखील गायले आहे.

'I-पॉपस्टार' स्पर्धेचे जज आस्था गिल, आदित्य रिखारी, परमिश वर्मा आणि किंग होते. रोहित राऊतने अनेक मोठे गायक, संगीत दिग्दर्शक यांच्यासोबत काम केले आहे. रोहितने सुरुवातीपासूनच 'I-पॉपस्टार'च्या मंचावर धुमाकूळ घातला आहे. रोहित आपल्या विजयानंतर सर्व चाहत्यांचे, त्याला पाठिंबा देणाऱ्या लोकांचे आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' गैरसमज टाळा; तज्ज्ञांनी सांगितल्या केसांची योग्य काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

रविवारी लोकलचा मेगा ब्लॉक! मध्य आणि हार्बर मार्गावर होणार परिणाम; घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहाच

Maharashtra News Live Update: Pune: पर्वती पायथा येथे अनेक वर्ष जुने असलेले वडाचे झाड पडले

१६७० मधील लढाईनं बदलला पुण्यातील 'या' डोंगरी किल्ल्याचा इतिहास

8th Pay Commission: शिक्षकांचा पगार किती वाढणार? किती मिळणार पेन्शन?

SCROLL FOR NEXT