Mi Vasantrao Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mi Vasantrao Movie: मराठमोळ्या चित्रपटाची ऑस्करवारी, ‘मी वसंतराव’ चित्रपटाचा परदेशात डंका...

अनेक हॉलिवुड आणि बॉलिवुड चित्रपटांसह मराठी चित्रपटाचा डंका ऑस्करमध्ये वाजला आहे.

Chetan Bodke

Mi Vasantrao Marathi Movie: द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस यांनी नुकतीच ९५ व्या ऑस्करसाठीची जगभरातील ३०१ चित्रपटांची रिमांइंडर लिस्ट जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अनेक बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटांनी यामध्ये आपले नाव पटकावले आहे. या यादीत २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

ऑस्कर २०२३ च्या यादीत द काश्मीर फाईल्स, आर.आर.आर, कांतारा, गंगूबाई काठियावाडी आणि रॉकेट्री - द नंबी इफेक्ट हा चित्रपटासोबतच राहुल देशपांडे अभिनित 'मी वसंतराव' चित्रपटाचाही समावेश झाला आहे.

ऑस्कर चित्रपटासाठी यावर्षी राहुल देशपांडे यांची मुख्य भूमिका असलेला आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘मी वसंतराव’ चित्रपटाची दखल घेण्यात आली आहे. पहिल्यांदाच गायक राहूल देशपांडे यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने आता पर्यंत अनेक पुरस्कारांमध्ये आपले नाव कोरले आहेत. 'मी वसंतराव' चित्रपटाची ऑस्करमध्येही एन्ट्री झाल्याने मला आनंद झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय पुरस्कार विजेते राहुल देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत आल्यानंतर गायक राहुल देशपांडे म्हणतात, "यानिमित्ताने आम्ही केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेतली जात आहे, ही अभिमानाची बाब आहे. शिवाय मराठी चित्रपट व संगीत सृष्टीसाठी देखील हे महत्त्वाचे आहे असे मी मानतो. ‘मी वसंतराव’ हा चित्रपट एक वेगळाच प्रयोग होता."

सोबतच गायक राहुल देशपांडे पुढे म्हणतात, "यामध्ये माझे आजोबा डॉ. वसंतराव देशपांडे यांचीच कथा मी त्यांचा नातू एक नट म्हणून रसिकांसमोर घेऊन आलो आहे. इतकेच नव्हे तर त्यातील गाणी आणि संगीत दिग्दर्शन हे देखील मी स्वत:च केले असल्याने हा चित्रपट अनेकार्थाने माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आजच्या या नामांकनाने मला खूप आनंद झाला आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT