Famous Singer SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Singer : प्रसिद्ध गायिकेवर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचं निधन

Famous Singer Father Death : बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिकेच्या वडिलांचे निधन झाले. सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करून गायिकेने याची माहिती दिली आहे.

Shreya Maskar

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडमधील एक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. गायिका निती मोहनच्या वडीलांचे निधन झाले आहे. ब्रिज मोहन शर्मा हे गायिका नीति मोहन, डान्सर शक्ती मोहन, अभिनेत्री आणि डान्सर मुक्ती मोहन यांचे वडील आहेत. वडिलांच्या निधनाने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याची माहिती नीति मोहनने दिली आहे.

शक्ती, नीति, मुक्ती यांचे वडील ब्रिज मोहन शर्मा यांचे 15 ऑक्टोबर 2026 रोजी निधन झाले. नीति मोहनने इंस्टाग्रामवर वडीलांचा फोटो शेअर करून एक भावनिक नोट लिहिली आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच नीतिच्या पोस्टवर चाहते आणि कलाकारांनी कमेंट्स करून श्रद्धांजली वाहिली आहे.

नीती मोहनची पोस्ट

"अत्यंत दुःख आणि जड अंतःकरणाने, आम्ही आमच्या प्रिय वडिलांच्या, श्री ब्रिज मोहन शर्मा यांच्या निधनाची बातमी कळवत आहोत; त्यांनी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी या जगाचा निरोप घेऊन ईश्वराच्या चरणी आश्रय घेतला आहे.एक प्रेमळ पती आणि वडील, मार्गदर्शक आणि आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ. त्याचे शहाणपण, दयाळूपणा, मूल्ये आणि बिनशर्त प्रेम आमच्या अंतःकरणात कायम राहील. ते आता आपल्यात नसले तरी त्याचे आशीर्वाद, शिकवण आणि सुंदर आठवणी आम्हाला आयुष्यभर मार्गदर्शन करत राहतील. त्याच्या अनुपस्थितीमुळे अशी पोकळी निर्माण झाली आहे जी कधीही भरून काढता येणार नाही, परंतु त्याचे प्रेम आपल्या हृदयात कायम राहील.

त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो.

आम्हाला तुमची आठवण येईल पप्पा!"

ब्रिजमोहन शर्मा कोण होते?

ब्रिज मोहन शर्मा हे चार सेलिब्रिटी मुलींचे वडील होते. गायिका नीती मोहन, नृत्यांगना शक्ती मोहन, आणि मुक्ती मोहन आणि कृती मोहन. त्यांच्या पश्चात पत्नी कुसुम शर्मा आणि त्यांच्या चार मुली असा परिवार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT