Javed Akhtar Saam TV
मनोरंजन बातम्या

Javed Akhtar: कंगनाच्या आरोपांनी जावेद अख्तर संतापले; न्यायालयात केली अभिनेत्रीची पोलखोल

Javed Akhtar On Kangana Ranaut: कंगना आपल्यावर खोटे आरोप करत आपली बदनामी करत आहे असं, म्हणत जावेद अख्तर यांनी अंधेरीच्या मेट्रोपॉलिटन कोर्टात धाव घेतली.

Ruchika Jadhav

Mumbai News: गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री कंगना रणौत या दोघांमधील वादावर आता जावेद यांनी कोर्टात आपली बाजू मांडली आहे. कंगना आपल्यावर खोटे आरोप करत आपली बदनामी करत आहे असं, म्हणत जावेद अख्तर यांनी अंधेरीच्या मेट्रोपॉलिटन कोर्टात धाव घेतली. त्यावर त्यांनी कोर्टासमोर आपली बाजू मांडली आहे. (Latest Marathi News)

जावेद यांनी आपली बाजू मांडताना म्हटलं आहे की, " मी आतापर्यंत प्रत्येक व्यक्तीला आदर देत त्यांच्याशी संवाद साधला आहे. माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलांना देखील मी फार आदर देतो. कंगनाने जे आरोप माझ्यावर केले आहेत ते पूर्णत: खोटे आहेत. ती माझ्यावर आरोप करून माझी प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहे,असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.

तसेच पुढे अभिनेता ऋतीक रोशन आणि कंगना यांच्यातील वादावरून कंगनाने केलेल्या आरोपांवर देखील जावेद अख्तर यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे. यावर ते म्हणाले की, "जेव्हा कंगना आणि ऋतीक या दोघांमध्ये वाद सुरू होते तेव्हा त्यांना समजवण्याचा मी सर्वोतोपरी प्रयत्न केला. मात्र कंगनाने यात मलाच दोषी ठरवले.

सुशांतच्या आत्महत्येवरूनही कंगनाने जावेद यांच्यावर आरोप केले होते. सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेकांनी बॉलिवूडमधील परिस्थितीवर भाष्य केलं होतं. तसेच अनेक दिग्गज मोठ्या हस्तींची नावे घेत बॉयकॉट बॉलिवूड करण्यात आले होते.

यावेळी कंगनाने (Kangana) बॉलिवूडच्या अनेक कलाकारांवर गंभीर आरोप केले होते. तिच्या आरोपांमुळे जावेद अख्तर यांनी तिला धमकी दिल्याचा आरोपही तिने केला होता. त्यामुळे न्यायालात जावेद अख्तर यांनी यावर देखील आपलं मौन तोडलं आहे. आपल्यावरील सर्व आरोप झूगारून लावलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

SCROLL FOR NEXT