Tara Sutaria Video SAAM TV
मनोरंजन बातम्या

Tara Sutaria Video : अभिनेत्रीला पाहून गायकाला लागलं याड; Live कॉन्सर्टमध्ये केलं Kiss, बॉयफ्रेंड वीर पहारिया संतापला, म्हणाला...

Tara Sutaria Viral Video : सध्या सोशल मीडियावर तारा सुतारियाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात प्रसिद्ध गायक तिला किस करताना दिसत आहे. यावर वीर पहारियाची रिएक्शन व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

तारा सुतारिया आणि वीर पहारिया हे बॉलिवूड कपल सध्या चांगले चर्चेत आहे.

एका गायकाने ताराला किस केली, त्यावर वीरची रिएक्शन इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

तारा सुतारिया आणि वीर पहारियाने अलिकडेच आपल्या नात्याची कबुली दिली.

सध्या तारा सुतारिया आणि वीर पहारिया हे बॉलिवूडचे कपल चांगले चर्चेत आहे. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात तारा सुतारियाला एक लोकप्रिय अभिनेता किस करताना दिसत आहे आणि हे पाहताच वीर पहारिया चांगलाच संतापला आहे. नेमकं झालं काय, जाणून घेऊयात.

प्रसिद्ध गायक एपी ढिल्लोंचा शुक्रवारी रात्री मुंबईत लाइव्ह कॉन्सर्ट होता. त्याचा आवाज ऐकण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. या कॉन्सर्टला तारा सुतारिया आणि वीर पहारिया देखील गेले होते. या कॉन्सर्टमध्ये एपी ढिल्लों गाणे गाताना ताराला स्टेजवर बोलावतो. त्यानंतर एपी गाणे गाताना दिसतो तर तारा गाण्याचा आनंद घेताना दिसत आहे. त्यानंतर एपी ढिल्लों ताराला मिठी मारतो आणि तिच्या गालावर किस करतो. तिच्यासोबत स्टेजवर नाचतो. तर एपीच्या खांद्यावर हात ठेवून तारा देखील कॉन्सर्ट एन्जॉय करताना दिसतेय.

तारा सुतारिया आणि एपी ढिल्लोंचा हा अंदाज कॉन्सर्ट पाहायला आलेला वीर पहारिया देखील पाहतो. आपल्या गर्लफ्रेंडची गायकासोबत अशी जवळीक पाहून अभिनेता चांगलाच संतापतो. तिच्या रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गायकाने ताराला किस करताच रागाने वीरचा तीळ पापड होतो. वीर ताराकडे पाहतच राहतो.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

तारा सुतारियाचा हा व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. नेटकरी तिला ट्रोल करत आहे. तसेच वीरच्या रिएक्शनवर कमेंट्स करत आहे. एका युजरने लिहिलं की, "वीर अस्वस्थ दिसत आहे..." तर दुसऱ्याने लिहिलं की, "तारा सुतारिया समजलं पाहिजे गायकाच्या खांद्यावर हात ठेवण्याआधी..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC Exam Update: राज्यसेवा २०२५च्या मुलाखती अखेर पुढे ढकलल्या; नवी तारीख काय?

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Maharashtra News Live Update: सांगलीत पावसाने दडी मारल्याने भात पीक धोक्यात

Blouse Trendy Designs: साधी साडी असो वा पैठणी, 'या' ब्लाऊज डिझाइन्स देतील सुंदर लूक; पाहा ७ ट्रेंडी डिझाइन्स

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळा सोनं किती रुपयांना? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

SCROLL FOR NEXT