Bigg Boss Daily Update Instagram/ @colorsmarathi
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi 4: किरण मानेंचे थेट प्रश्न, अमृता फडणवीसांचे रोखठोक उत्तरांचा खेळ रंगणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Bigg Boss Marathi 4 Latest Update: बिग बॉसच्या घरात सर्वच स्पर्धकांकडून दिवाळीचा सण मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. बिग बॉसच्या घरात यावेळी अनेक कलाकार मंडळींनी स्पर्धकांची दिवाळी खास केली आहे. या सीझनमध्ये बिग बॉसच्या घरात मुख्य पाहूण्यांमध्ये 'मुंबईचे डबेवाले' ही होते. दिवाळीनिमित्त मुंबईच्या डबेवाल्यांनी बिग बॉसच्या स्पर्धकांना फराळ वाटप केले.

दिवाळीचे औचित्य साधत बिग बॉसच्या (Bigg Boss) घरात 'भाग्य दिले तू मला' मालिकेतील तन्वी मुंडले आणि विवेक सांगळे स्पर्धकांची दिवाळी खास करण्यासाठी आले होते. तसेच सर्वच स्पर्धकांचा उत्साह आणखी द्विगुणीत काल घरात समाजसेविका आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) उपस्थित राहिल्या होत्या. किरण माने आणि यशश्री मसुरकरने अमृता फडणवीसांच्या खासगी आयुष्यातील काही प्रश्नही यावेळी विचारण्यात आले असून त्या प्रश्नांना त्यांनी आपल्या खास शैलीत उत्तरं दिले. (Bigg Boss Marathi)

सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेल्या एका प्रोमोत, स्पर्धक किरण माने अमृता मानेंना काही प्रश्न विचारले आहे. त्यातील एक प्रश्न म्हणजे, 'महाराष्ट्राचं एक राजकीय वर्तुळ आहे ते म्हणजे एक बिग बॉस आहे. तर त्यातले टॉप 5 सदस्य कोण वाटतात तुम्हाला. यावर मजेशीर उत्तर देत अमृता फडणवीस म्हणतात, 'आपल्याला डॅशिंग स्पर्धक हवे, जे कधीही काहीही बोलू शकतील आणि आग लावू शकतील.'

तसेच किरण मानेने आणखी एक प्रश्न विचारत जरा बुचकळ्यात टाकले आहे, 'आमच्यासारखे तुमच्यातही वाद होत असतील ना मी हे नाही करणार ते नाही करणार.' यावर अमृता फडणवीस म्हणतात, 'आपला नवरा हाती तर लागला पाहिजे ना काम द्यायला'. शेअर केलेल्या या प्रोमोची चांगलीच चर्चा होत आहे. त्यामुळे आजच्या या भागात अमृता फडणवीसांच्या प्रश्नोत्तराच्या खेळाची मजा आजही अनुभवता येणार आहे.

आज बिगबॉसच्या घरामध्ये भाऊबीज साजरी होणार आहे. यशश्री आणि समृद्धी योगेशला भाऊ मानत असल्याने ही बिग बॉसच्या घरातील विशेष भाऊबीज असणार आहे. आज बिग बॉसच्या घरातील भाऊबीज कशी साजरी केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांचा राडा, दोन गटांत तुंबळ हाणामारी, पाहा

PM Kisan Samman Nidhi : नवरात्रीनिमित्त PM मोदींकडून शेतकऱ्यांसाठी मोठं गिफ्ट; किसान सम्मान निधीचा १८ वा हप्ता खात्यात जमा

Bombay Vada pav : मुंबईच्या वडापावचं टोपण नाव माहितीये का?

PM Modi : पंतप्रधान मोदींची विरोधकांवर कठोर शब्दांत टीका; पाहा Video

Marathi News Live Updates : सांगलीमध्ये ४० ते ५० जणांना भगरीच्या तांदळातून विषबाधा

SCROLL FOR NEXT