गणपती बाप्पा जेवढं भक्त आनंदी होतात. तेवढंच दुःख गणपतीच्या विसर्जनाला होता. नुकतेच गौरी - गणपतींचे विसर्जन झाले आहे. गौरी - गणपती विसर्जनानंतर समुद्र किनारी साफसफाई करण्यासाठी गायक आणि अभिनेता उत्कर्ष शिंदे सज्ज झाला आहे.
उत्कर्ष शिंदेने मुंबईतील स्वछता अभियानात भाग घेतला होता. पर्यावरणातच तोल सांभाळ ही आपली जबाबदारी असल्याचे देखील उत्कर्षने म्हटले आहे. सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहीत उत्कर्षने सगळ्यांना भानावर आणण्याचे काम उत्कर्षने केले आहे.
'महाराष्ट्र आपला, उत्सव आपला, बाप्पा आपले, तर जबाबदारीही आपलीच .....!! आपल्या सर्वांचा आवडीचा गणेशोत्सव सुरू आहे.५ दिवसाच्या गौरी- गणेशाचे विसर्जन ही झाले आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी अनेक समुद्र किनारपट्टीही सुसज्ज होत्या.
पण याही वेळेस काही प्रमाणत जल प्रदूषण हे नेहमीप्रमाणे दिसून आलेच. कमीत कमी प्रदूषण करत आपले सण साजरे करू. हाच विचार मनी ठेऊन काल “क्लिनेथोन ५.०” बीच क्लीनिंगमध्ये असंख्य मुंबईतील विद्यार्थ्यांसोबत मी सहभाग घेतला.
पर्यावरण रक्षणासाठी सरकार जागरूक आहे. परंतू ही जबाबदारी फक्त सरकारचीच नाही. यासाठी आपण सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे. जी काही निसर्गाची देन आपल्याला लाभली आहे, तिला सांभाळून ठेवणे. तसेच प्रकृतीला आपल्या कृत्यामुळे कुठलीही इजा होणार नाही याची काळजी घेणे. (Celebrity)
पर्यावरणाचा ढासाळत चाललेला हा समतोल सांभाळणे आता आपली जबाबदारी आहे. जर आपण आज पर्यावरणाची काळजी घेतली नाही तर भविष्यात आपल्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील हे निश्चित.
समाजौन्नती कॉलेज, युनायटेड फॉर ग्रेटर कॉज, रजनी फाउंडेशन इंडियासोबत काल २४ सप्टेंबर रोजी मी “क्लीनथोन ५.०“ सहभाग घेत स्वच्छता अभियान राबवलं.'
उष्कर्ष शिंदेच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्याचे 'मी कार्यकर्ता' हे गाणे या महिन्याच्या सुरुवातीला प्रदर्शित झाले आहे. उष्कर्ष नेहमीच नवीव प्रयोग करत असतो आणि उत्तम कलाकृती आपल्या भेटीला आणत असतो. (Latest Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.