Utkarsh Shinde On Aanand Shinde Birthday Saam Tv
मनोरंजन बातम्या

Utkarsh Shinde Post: "कोरस देणारा ते शिंदेशाही ब्रँडचा बादशहा..."; उत्कर्ष शिंदेची वडील आनंद शिंदेंसाठीची खास पोस्ट चर्चेत

Aanand Shinde Birthday: आनंद शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मुलगा आणि अभिनेता उत्कर्ष शिंदेने एक खास पोस्ट शेअर केली आहे. उत्कर्ष शिंदेची वडीलांसाठीची वाढदिवसानिमित्तची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

Chetan Bodke

Utkarsh Shinde On Aanand Shinde Birthday

महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक (singer) आनंद शिंदे (anand shinde) यांचा आज वाढदिवस (birthday). त्यांचे अनेक गाणे आज चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. त्यांनी फक्त मराठी सिनेसृष्टीसाठीच नाही तर, बॉलिवूडसाठीही गाणी गायली आहेत. वडील प्रल्हाद शिंदे यांच्याकडून आनंद शिंदे यांनी गायनाचे बाळकडू घेतले. आनंद शिंदे लोकगीतांसाठी चाहत्यांध्ये प्रसिद्ध आहेत. आनंद शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मुलगा, डॉक्टर आणि अभिनेता उत्कर्ष शिंदेने एक खास पोस्ट शेअर केली आहे. उत्कर्ष शिंदेचीही वडीलांसाठीची खास पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. (Singer)

बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदेने पोस्टमध्ये लिहिलंय की,

“माझं अवॉर्ड माझं रसिक आहेत….“आनंद प्रल्हाद शिंदे” नाव नाही ब्रॅंड आहे. वय वर्ष १३ कवालीमध्ये तबला वाजवणारा, कोरस करणारा लहान कलाकार ते आज सातासमुद्र पार घराघरांत पोहचलेला जिवंत शिंदेशाही ब्रँडचा बादशाह. गाण्याला देव मानणारा, गाण्यासाठी जन्म घेतलेला आणि गाणं नसेल तर श्वास नको म्हणणारा एक सच्चा अवलिया कलाकार. लहानपणापासून पाहत आलो ना आवाजात ना गाण्यात ना प्रेक्षकांच्या प्रेमाबद्दल. नेता असो अभिनेता असो की गरीबात गरीब व्यक्ती असो सर्वांशी समान आपुलकीचे नाते. मी खूप मोठा कलाकार आहे ना असा त्यांना वाटतं ना ते कधी समोरच्याला जाणवू देतात.” (Marathi Actors)

“मातीतला कलाकार. बायपास होऊन देखील गाण्याला जीवन मानत प्रवास करत सगळे कार्यक्रम सुपरहिट करत प्रेक्षकांचे अमोल प्रेम आशिर्वाद मिळवणारे. दौऱ्या दरम्यान गाव खेड्यातून गोर गरिबांच्या वस्तीतून जाताना “माझे चाहते आहेत, मला उतरायला हवं” म्हणत एकेकाला आपुलकीने फोटो देणारे. आरामात त्यांच्यासोबत चहा घेणारे... माझे वडील “THE LIVING LEGEND ANAND SHINDE” आज तुमचा वाढदिवस “२१ एप्रिल” रात्री पुण्यात कार्यक्रम करून तुम्ही भेटायला आलात. आज पहाटे ३ ते ६ तुमचा वेळ मला मिळाला. भेटल्यावर तुम्ही गळ्यात पडलात आणि अचानक मी लहान झालो. तुमच्या सारखा वडील, भाऊ, नवरा, कलाकार कोणी होऊ शकत नाही. तुमच्या वाढदिवसादिनी हेच म्हणेन. “तुम्हाला माझंही आयुष्य लाभावं” तुम्ही असच गात राहावं. तुमचा मुलगा- डॉ उत्कर्ष आ शिंदे” (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange patil protest live updates: हैदराबाद गॅझेट लागू करताच धाराशिवमध्ये मराठा बांधवांचा जल्लोष

Vada Pav Recipe: घरच्या घरी फक्त १० मिनिटांत बनवा वडापाव

Alia Bhatt and Katrina Kaif: आलिया भट्ट की कतरिना कैफ कोण आहे जास्त श्रीमंत?

Manoj Jarange Protest: मनोज जरांगेंच्या मागण्या काय होत्या? सरकारकडून नेमका काय निर्णय झाला? वाचा सविस्तर

Fraud Marriage : विवाह लावून देत फसवणूक; लाखोंचा गंडा घालणाऱ्या बंटी बबलीच्या पर्दाफाश

SCROLL FOR NEXT