Sikandar Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Sikandar Box Office Collection : विकीवर भारी पडणार सलमान? 'सिकंदर'नं पहिल्या दिवशी 'इतके' कोटी कमावले

Sikandar Box Office Collection Day 1: सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कोटींची कमाई केली जाणून घेऊयात.

Shreya Maskar

भाईजानच्या 'सिकंदर' (Sikandar ) चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. सलमान खानचा 'सिकंदर' विकी कौशलच्या 'छावा' रेकॉर्ड मोडणार असल्याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. 'सिकंदर' चित्रपट काल (30 मार्च) ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'सिकंदर' ने बंपर कमाई केल्याचे पाहायला मिळत आहे. 'सिकंदर' ची पहिल्या दिवसाची कमाई (Sikandar Box Office Collection Day 1) जाणून घेऊयात.

'सिकंदर' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 1

मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानच्या (Salman Khan) 'सिकंदर' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 26 कोटींची कमाई केली आहे. विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 33.10 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. 'छावा' चा पहिल्या दिवशी रेकॉर्ड मोडण्यास 'सिकंदर' अपयशी ठरला आहे.

'सिकंदर' स्टारकास्ट

'सिकंदर' चित्रपटात सलमान खानसोबत साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना पाहायला मिळत आहे. चित्रपटातील त्यांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांना वेड लावले आहे. या चित्रपटात यांच्यासोबत काजल अग्रवाल, शरमन जोशी, प्रतिक बब्बर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. 'बाहुबली' फेम अभिनेते सत्यराज 'सिकंदर' चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

'सिकंदर' ओटीटी रिलीज

'सिकंदर' चित्रपटाचे दिग्दर्शन ए. आर. मुरुगदास यांनी केले आहे. सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाचे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने विकत घेतले आहेत. 'सिकंदर'चा बजेट 180 कोटी आहे. चित्रपटाने रिलीजआधीच तब्बल 165 कोटींची कमाई केली आहे. 'सिकंदर' आज ईदला किती कोटींची कमाई करतो हे पाहणे मनोरंजक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'सिकंदर'च्या कामाईमध्ये आज झपाट्याने वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Recruitment: रेल्वेत सर्वात मोठी भरती! ११००० पेक्षा जास्त रिक्त पदे; अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Balumama Temple : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी, बाळूमामांचे मंदिर ३ दिवस राहणार बंद, नेमकं कारण काय?

Panchang Today: आज शुक्ल नवमी, रोहिणी नक्षत्र प्रभावी; वृषभ राशीत चंद्रामुळे चार राशींना मिळणार पैसा

Rashmika-Vijay Wedding : विजय देवरकोंडाच्या आईने सुनबाईंसाठी घातल्या ३ अटी, रश्मिका मंदाना पूर्ण करणार का? लग्नाआधी VIDEO चर्चेत

Upper Lips Hair Removal Tips: ओठांवरचे केस घरी कसे काढायचे?

SCROLL FOR NEXT