Sidhu Moose Wala New Song Release Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sidhu Moose Wala Song: सिद्धू मुसेवालाचे 'वार' हे दुसरे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल

सिद्धू मुसेवालाचे नवीन गाणे प्रदर्शित होताच या गाण्याला 1 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sidhu Moose Wala New Song Update: दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाचे चाहते आजही त्याला विसरू शकलेले नाहीत. आज तो आपल्यात नसला तरी त्याच्या चाहत्यांच्या मनात तो अजरामर आहेत. मंगळवारी या गायकाचे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.

मुसेवालाच्या हत्येनंतरचे त्याचे हे दुसरे गाणे प्रदर्शित झाले आहे, ज्यामुळे लोकांमध्ये धमाका होत आहे. गाणे प्रदर्शित होण्याआधी गायकाच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक स्टेटस अपडेट केले गेले होते, ज्यामध्ये 'वार' गाण्याचा उल्लेख होता. ही बातमी समजल्यापासून लोक या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते.

सिद्धू मुसेवाला त्याच्या चाहत्यांच्या हृदयात कायमच राहणार आहे. हे त्याचे दुसरे गाणे आहे जे त्यांच्या निधनानंतर प्रदर्शित झाले आहे. यापूर्वी 'एसवायएल' हे गाणे प्रदर्शित झाले होते. त्या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. आता नवीन गाणे प्रदर्शित होताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काही मिनिटांतच या गाण्याला 1 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. (Social Media)

गुरुपर्वाच्या दिवशी पारायण झाल्यानंतर 10 वाजता हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे देखील एक 'वार' आहे, जे त्याने पंजाबच्या वीर हरी सिंह नलवासाठी गायले आहे. सरदार हरिसिंह नलवा हे नलवाचे राजे महाराजा रणजित सिंह यांचे लष्करप्रमुख होते. महान सेनानी हरिसिंह नलवा यांनी पठाणांविरुद्ध अनेक युद्धांचे नेतृत्व केले होते आणि महाराजा रणजित सिंग यांना विजय मिळवून दिला. एवढेच नाही तर नलवा हे भारतातील सर्वोत्तम योद्ध्यांपैकी एक आहेत. (Song)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'चार खोके तिकीट ओके'! विधानसभा तिकीटांची कोट्यवधी रुपयांना विक्री? काँग्रेस-भाजपमध्ये रंगला 'गेम वॉर'

Shakuntala Tai Nagarkar passed away: ज्येष्ठ लावणीसम्राज्ञीचं निधन; कर्करोगाशी प्रदीर्घ झुंज अखेर थांबली

कांदा, लसूणनंतर शाळेत मेथीवरही बंदी, मेथी आणणाऱ्या विद्यार्थ्याला 50 रुपयांचा दंड

जरांगे पाटलांची टीम आयटीच्या फेऱ्यात, जरांगेंच्या सहकाऱ्यांची आयकर चौकशी

राहुल गांधींचा फोन अन् भाजपचा प्लॅन फेल; राज्यातील बड्या नेत्याच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक

SCROLL FOR NEXT