Sidharth Malhotra On Mission Majnu and Raazi Comparison
Sidharth Malhotra On Mission Majnu and Raazi Comparison Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sidharth Malhotra On Mission Majnu: 'मिशन मजनू'साठी चाहते होईना 'राझी', सिद्धार्थने काढली प्रेक्षकांची समजूत

Pooja Dange

Sidharth Malhotra On Mission Majnu And Raazi: सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'मिशन मजनू' हा चित्रपट 20 जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात सिद्धार्थ पाकिस्तानमध्ये राहणारा भारतीय गुप्तहेर तारिकची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर अभिनेत्री रश्मिका मंदाना या चित्रपटात नसरीनची भूमिका साकारत आहे, जी पाकिस्तानी आहे.

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​याने एका मुलाखतीत 'राझी' आणि 'मिशन मजनू' या चित्रपटांमधील तुलनेबद्दल सांगितले आहे. 'मिशन मजनू' चित्रपटाचे निर्माते शंतनू बाग यांनी केली असून सहनिर्माते रॉनी स्क्रूवाला, अमर बुटाला आणि गरिमा मेहता यांना केली आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनुसार, 'मिशन मजनू' हा 1970 च्या दशकातील चित्रपट आहे, जो एका सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​रॉ एजंटच्या भूमिकेत आहे. जो भारतासाठी एक धोकादायक मिशन पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानात गेला आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काही लोकांनी त्याची तुलना आलिया भट्टच्या 'राझी' चित्रपटाशी करण्यास सुरुवात केली.

अभिनेत्री आलिया भट्ट आणि विकी कौशल स्टारर 'राझी' चित्रपटामध्ये आलिया भट्टने 20 वर्षांच्या काश्मिरी मुलीची भूमिका साकारली होती. त्यानंतर अभिनेत्री आलियाने भारताची गुप्तहेर असून पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याशी लग्न करते आणि सर्व प्रकारची माहिती भारतीय लष्कराला देते.

दरम्यान एका मुलाखतीमध्ये सिद्धार्थ मल्होत्राने ​​'मिशन मजनू' आणि 'राझी'च्या तुलनेविषयी मत व्यक्त केले आहे. सिद्धार्थने म्हणाला की, लोकांना कोणत्याही चित्रपटाबद्दल काही मुद्दा आढळल्यास ही वाईट गोष्ट नाही. 'राझी' चांगला चित्रपट आहे. तुलना ही धोकादायक गोष्ट नाही. होय काही गोष्टींमुळे लोकांना चित्रपटाचा ट्रेलर सारखाच वाटू शकतो.

'मिशन मजनू' 1970 च्या दशकावर आधारित चित्रपट आहे आणि काही गोष्टी समान आहेत, परंतु मला वाटते की गोष्टी पूर्णपणे भिन्न आहेत. सिद्धार्थ म्हणाला की प्रेक्षकांनी एकदा चित्रपट पाहावा, मग ते यावर योग्य चर्चा करू शकतील. तो पुढे म्हणाले की, चांगल्या चित्रपटाशी तुलना करणे वाईट नाही.

पुढे तो म्हणाला की, चित्रपट लिहिताना लेखकांनी पूर्ण काळजी घेतली आहे की, कोणत्याही विशिष्ट समाजाबाबत यात काहीही चुकीचं समोर येणार नाही. मी अलीकडेच शेरशाह केला, जो भारत आणि पाकिस्तानवर आधारित आहे. या चित्रपटात दोन्ही देशांमधली जी लढत झाली, तो एक डॉक्युमेंट होता.

सिद्धार्थ म्हणाला की, जेव्हा तुम्ही चित्रपट पाहाल तेव्हा तुम्हाला समजेल की शेरशाहमध्ये आम्ही चार दृश्ये वगळता दुसऱ्या बाजूकडे (पाकिस्तान) लक्ष दिलेले नाही. हा चित्रपट पूर्णपणे भारताविषयी आणि शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्राची कथा आहे.

'मिशन मजनू' या चित्रपटातही असेच काहीसे घडले आहे. कोणाशीही वैयक्तिक वैर नाही, हे फक्त कागदोपत्री इतिहासाचे मुद्दे आहेत. जे कधीच पूर्ण होणार नाही. तसेच त्याने पुढे सांगितले की, चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर जे तुलना करत आहेत, त्यांनी चित्रपट पाहावा असे म्हणणे योग्य आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan House Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणात गँगस्टर रोहित गोदाराची एन्ट्री

Pune News : रात्री 12 वाजता बॅंक सुरु! निवडणूक आयोगाची बॅंकेवर मोठी कारवाई

Special Report : Election Scam | माढ्यात नकली नोटांचा पाऊस! उत्तम जानकरांचा आरोप काय?

IPL 2024 DC vs RR: घरच्या मैदानात दिल्लीची फटकेबाजी; राजस्थानसमोर २२२ धावांचे आव्हान

Special Report : किरण सामंत नॉट रिचेबल! राणेंचं टेंशन वाढवणार?

SCROLL FOR NEXT